एमसीएम महिला क्रिकेट लीग,
ग्लोरियस सीसीचा 198 धावांनी विजय
14 वर्षीय ईरा जाधवची नाबाद 182 धावांची खेळी
मुंबई, 29 फेब्रुवारी: सर्वोत्तम सूर गवसलेली 14 वर्षीय शाळकरी खेळाडू ईरा जाधवने विक्रमी
नाबाद 182 धावांची खेळी करताना एमसीएम महिला क्रिकेट लीगमध्ये ब गटातील तिसर्या फेरीच्या सामन्यात गुरुवारी ग्लोरियस क्रिकेट क्लबला रिगल क्रिकेट क्लबविरुद्ध 198 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित स्पर्धेत ईरा हिने फॉर्म कायम राखताना प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. तिने अवघ्या114 चेंडूंत 23 चौकार आणि नऊ षटकारांसह ग्लोरियस सीसीला 37 षटकांत 3 बाद 331 अशी मोठी धावसंख्या गाठून दिली. प्रत्युत्तरादाखल, रिगल सीसीचा डाव 34.1 षटकांत 133 धावांत आटोपला. त्यांच्याकडून हर्षल जाधवने सर्वाधिक 39 धावा केल्या. ग्लोरियस सीसीकडून करुणा घारेने 21 आणि भार्गवी पाटीलने 23 धावांत प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
अन्य सामन्यांमध्ये स्पोर्टिंग युनियन क्लबने बोरिवली सीसीचा सहा विकेट राखून पराभव केला. दहिसर एससीने जे. भाटिया एससी संघाचा 149 धावांनी मात केली.
संक्षिप्त धावफलक - ब गट: ग्लोरियस सीसी - 37 षटकांत 3 बाद 331 (ईरा जाधव 182* (114 चेंडू, 23 चौकार, 9 षटकार), जेटसन ची 27; सुषमा पाटील 1/29) विजयी
वि. रिगल सीसी 34.1 षटकांत सर्वबाद 133(हर्षल जाधव 39, सृष्टी नाईक 23, मोनिका तिवारी 20; करुणा घारे 2/21, भार्गवी पाटील 2/23).
बोरिवली सीसी 38.1 षटकांत सर्वबाद 154(गार्गी वारंग 38, तनिशी शहा 32, प्रियांका राठोड 20; जान्हवी वाडकर 3/16, उन्नती घरत 2/15) पराभूत वि. स्पोर्टिंग युनियन क्लब - 30.2 षटकांत 4 बाद 155(जुईली भेकरे 34, स्वरा खेडेकर 29, याश्वी गोरी 20; रुया वांजळे 2/20).
दहिसर एससी - 40 षटकांत 3बाद 252(राधिका ठक्कर 107* (77 चेंडू, 16 चौकार, 2 षटकार), सौम्या सिंग 77*, तन्वी गावडे 26, स्नेहा रावराणे 25; धनश्री परब 2/35) विजयी वि. जे. भाटिया ए
Post a Comment
0 Comments