Type Here to Get Search Results !

आरसीएफ टी-ट्वेन्टी चषक क्रिकेट स्पर्धा रिझर्व्ह बँकेचा 5 विकेट राखून विजय

 

आरसीएफ टी-ट्वेन्टी चषक क्रिकेट स्पर्धा

रिझर्व्ह बँकेचा 5 विकेट राखून विजय

मुंबई: आरसीएफ टी ट्वेन्टी चषक क्रिकेट स्पर्धेत रिझर्व्ह बँकेने अकाउंटंट जनरल क्लबवर 5 विकेट राखून पराभव केला.आरसीएफ स्पोर्ट्स क्लबवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकाउंटंट जनरल क्लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 167 धावा केल्यात्यात ब्रविश शेट्टीचे (45 धावासर्वाधिक योगदान राहिलेरिझर्व्ह बँकेकडून जय नायकने 17 धावांत 4 विकेटअमेय दांडेकरने 47 धावांमध्ये 2 विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना कमी धावसंख्येत रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.

प्रत्युत्तरादाखलभारतीय रिझर्व्ह बँक संघाने 18.5 षटकांत 5 विकेटच्या बदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केलेरूप कुमारने सर्वाधिक 50 धावा करताना फलंदाजी उंचावण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेप्रसाद.बोडकेने 45, रमनप्रीत सिंगने 36 आणि अमेय दांडेकर नाबाद 26 धावा करताना विजय अधिक सुकर केला.

रिझर्व्ह बँकेचा गोलंदाज जय नायक (4-17) सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक - 20 षटकांत 9 बाद 167(ब्रविश शेट्टी 45, मल्हार माने 25, भावेश पटेल 25; जय नायक 4/17, अमेय दांडेकर 2/47) विभारतीय रिझर्व्ह बँक - 18.5 षटकांत 5 बाद 173(रूप कुमार, 50, प्रसाद.बोडके 45, रमनप्रीत सिंग 36, अमेय दांडेकर 26*; भावेश पटेल 2/28). निकालरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 5 विकेट राखून विजयी.

Post a Comment

0 Comments