Type Here to Get Search Results !

आरसीएफ टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा अकाउंटंट जनरल स्पोर्टस क्लबचा मुंबई पोलिसांवर विजय

 

आरसीएफ टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धा


अकाउंटंट जनरल स्पोर्टस क्लबचा मुंबई पोलिसांवर विजय 


 

मुंबई आरसीएफ-डॉबाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात अकाउंटंट 

जनरल स्पोर्टस क्लबने ग्रेटर मुंबई पोलीस स्पोर्ट्स क्लबवर 30 धावांनी विजय मिळवला

 

बृहन्मुंबई पोलिसांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलात्यानंतर अकाउंटंट जनरल स्पोर्टसक्लबने 20 षटकांत 4 बाद 193 धावा केल्यात्यात सलामीवीर स्वप्नील साळवी (69 धावा, 31 चेंडू, 6 चौकार, 5 षटकातआणि वरुण लवंदे यांचे (47 धावा, 34 चेंडू, 6 चौकार, 1 षटकारसर्वधिक योगदान राहिलेया  

जोडीने १२७ धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली.

 

प्रत्युत्तरादाखलग्रेटर मुंबई पोलिस स्पोर्ट्स क्लबला 20 षटकांत 7 बाद 163 धावा करता आल्यारोहित पोळ (47) आणि सूरज शिंदेने (41) थोडा प्रतिकार केला तरीही अन्य सहकाऱ्यांनी निराशा केलीअकाउंटंट जनरल स्पोर्टस क्लबकडून इम्तियाज अहमद आणि जेफ परेराने प्रत्येकी 2 विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.

 

अन्य लढतीतविवा सुपरमार्केट एससीने रेप्रो इंडिया एससीवर  विकेट राखून मात केली.

 

संक्षिप्त धावफलकअकाउंटंट जनरल स्पोर्टस क्लब - 20 षटकांत 4 बाद 193 (स्वप्नील साळवी 69, वरुण लवंदे 

47, ब्रविश शेट्टी 30*, लार्सन डीकोस्टा 21; आर्यराज निकम 2/22) विग्रेटर मुंबई पोलीस स्पोर्ट्स क्लब - 20 षटकांत 7 बाद 163(रोहित पोळ 47, सूरज शिंदे 41, तनिश मेहेर 27; इम्तियाज अहमद 2/22, जेफ परेरा 2/39). निकाल : अकाउंटंट जनरल स्पोर्टस क्लब 30 धावांनी विजयी.

 

विवा सुपरमार्केट एससी - 20 षटकांत सर्वबाद 166(जिगर राणा 52, करण मोरे 41 मोहम्मद मोईन खान 4/24, 

सुमेर झवेरी 2/26) विरेप्रो इंडिया एससी - 18.1 षटकात 3 बाद 172( सुमेर झवेरी 35*, कुणाल कोठावदे 26, 

हर्ष साळुंखे 23; राहुल चौधरी 2/36). निकालरेप्रो इंडिया एससी  विकेट राखून विजयी.

Post a Comment

0 Comments