Type Here to Get Search Results !

पय्याडे एससीने जिंकला एमसीए प्रेसिडेंट चषक अंतिम फेरीत व्हिक्टरी सीसीवर नऊ विकेट राखून विजय

 


पय्याडे एससीने जिंकला एमसीए प्रेसिडेंट चषक 

अंतिम फेरीत व्हिक्टरी सीसीवर नऊ विकेट राखून विजय 

 

मुंबई, मध्यमगती गोलंदाज सौरभ सिंगचा (34 धावांत 5 विकेटप्रभावी मारा आणि धडाकेबाज सलामीवीर मुशीर खानच्या ( 87 धावासर्वोत्तम खेळीच्या जोरावर व्हिक्टरी सीसीवर नऊ विकेट राखून विजय मिळवताना पय्याडे स्पोर्ट्स क्लबने एमसीए प्रेसिडेंट चषक 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

 

बीकेसी येथील शरद पवार एमसीए क्रिकेट मैदानावर फ्लडलाइट्सखाली खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात शनिवारी रात्री प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना पय्याडेच्या गोलंदाजांना सुरुवातीला प्रभाव पाडता आला नाहीव्हिक्टरी सीसीने 7 षटकांत 73 धावा केल्यासौरभ सिंगने जय बिस्ताला (52 धावाबाद करून सलामी फोडलीत्यानंतर आणखी चार विकेट घेत व्हिक्टरी सीसीचा डाव 20 षटकांत 186 धावांवर रोखलाजयनंतर शास्वत जगताप (39), आयुष झिमारे (34), सूरज शिंदेने (24 धावासंघाला दोनशेच्या घरात नेण्यात खारीचा वाटा उचलला.

 

पय्याडे एससीने 190 धावांचे विजयी लक्ष्य 20 षटकांत अवघ्या एका विकेटच्या बदल्यात पार केलेत्यात मुशीर खानने मोलाचे योगदान दिलेत्याच्या 37 चेंडूतील 87 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 6 उत्तुंग षटकारांचा समावेश आहेभूपेन लालवानीने 40 चेंडूंत 60 आणि प्रसाद पवारने 26 चेंडूंमध्ये 41 धावा काढताना विजयावर शिक्काबोर्तब केले.



 

संक्षिप्त धावफलक - अंतिम फेरी: व्हिक्टरी सीसी -20 षटकांत सर्वबाद 186(जय बिस्ता 52, शास्वत जगताप 39, आयुष झिमारे 34, सूरज शिंदे 24; सौरभ सिंग 5/34) वि.पय्याडे एससी -20 षटकांत 1 बाद 190(मुशीर खान 87, भूपेन लालवानी 60, प्रसाद पवार 41). निकालः पय्याडे सीसी नऊ विकेट राखून विजयी.

Post a Comment

0 Comments