तिसरी एमसीए १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
वरळी स्पोर्ट्स क्लबचा ६ विकेटनी विजय
मुंबई, भामा क्रिकेट क्लबने मुंबई क्रिकेट क्लबच्या सहकार्याने आयोजित केलेल्या तिसऱ्या एमसीए १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या ग्रुप एफ सामन्यात वरळी स्पोर्ट्स क्लबने मुस्लिम युनायटेड स्पोर्ट्स क्लबवर सहा विकेट राखून विजय मिळवला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने वरळी एससी मैदानावर गुरुवारी झालेल्या लढतीत प्रथमफलंदाजीला आलेल्या मुस्लिम युनायटेडने 32 षटकांत 9 बाद 118 धावा केल्या. त्यात यासीन सौदागरच्या सर्वाधिक ५३ धावांचा समावेश आहे. वरळी एससीचा गोलंदाज नरेंद्र यादवने २३ धावांत ३ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरादाखल, वरळी एससी फलंदाजांनी आत्मविश्वासाने फलंदाजी करताना २१ षटकात ४ विकेटच्या बदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. सागर गुप्ताने नाबाद 44 धावा करताना मोलाचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक – ग्रुप ई: सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब - 35 षटकांत 7 बाद 154 (जय टोलिया 45; जय बक्षी 3/25) वि. यंग महाराष्ट्र सीसी - 32 षटकांत सर्वबाद 109 (जय बक्षी 30; निषाद सावंत 3/20). निकाल: सुपरस्टार एससी ४५ धावांनी विजयी.
ग्रुप एफ: मुस्लिम युनायटेड एससी - 32 षटकांत 9 बाद 118 (यासीन सौदागर 53; नरेंद्र
यादव 3/23) वि. वरळी स्पोर्ट्स क्लब - 21 षटकांत 4 बाद 120(सागर गुप्ता 44*).
निकाल : वरळी स्पोर्ट्स क्लब ६ विकेट राखून विजयी.
ग्रुप एच: डी.वाय. पाटील एसए - 30.3 षटकांत 9 बाद 155(अभिज्ञान कुंडू 63; प्रथमेश
मालवणकर 3/33) वि. वेलिंग्टन क्रिकेट क्लब - 34 षटकांत सर्वबाद146 (शरण हराळे 53). निकाल : डी.वाय. पाटील एसए 9 धावांनी विजयी.

Post a Comment
0 Comments