Type Here to Get Search Results !

नंदू नाटेकर स्मृती बॅडमिंटन स्पर्धा ग्रेटर मुंबई,नाशिक संघांची विजयी सुरुवात

 



नंदू
 नाटेकर स्मृती बॅडमिंटन स्पर्धा
ग्रेटर मुंबई,नाशिक संघांची विजयी सुरुवात


मुंबई, 29 सप्टेंबरमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र आंतरजिल्हा आणि 
खुल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आंतर जिल्हा महिला सांघिक स्पर्धेत ग्रेटर मुंबईसह नाशिक संघांनी विजयी सलामी दिली.

गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत पहिल्या दिवशी रविवारी ग्रेटर मुंबईने तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्धी संभाजीनगरचा 2-0 असा पराभव केलात्यात प्रतिभावंत खेळाडू नाईशा भातोयेचे महत्त्वपूर्ण योगदान 
राहिले.तिने एकेरीमध्ये संस्कृती सातारकर हिच्यावर 21-8, 21-7 अशी मात केलीनाईशा हिने दुहेरीमध्ये हिृसा 
दुबेसह संस्कृती आणि सोनाली मिर्खेलकरचा 21-15, 21-15 असा पराभव करताना ग्रेटर मुंबईला 2-0 अशी
निर्णायक आघाडी मिळवून दिली.

याच गटातील अन्य सामन्यातनाशिकने अहमदनगरला 2-0 अशा फरकाने हरवलेएकेरीत वरदा एखंडने 
श्रेया राठोडवर 21-11, 21-11 असा विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिलीत्यानंतर दुहेरीत हेतल 
विश्वकर्माआणि प्रांजल अंधारेने श्रद्धा मलिका आणि तेजल कुलाल यांचे आव्हान 21-5, 21-14 असे परतवून 
लावताना एकूण आघाडी 2-0 अशी वाढवली.

तत्पूर्वीभारताचा दुहेरीतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मुंबईचा चिराग शेट्टी याच्या हस्ते स्पर्धेचे 
उद्घाटन झाले.

फोटो भारताचा दुहेरीतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मुंबईचा चिराग शेट्टी याच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले

Post a Comment

0 Comments