Type Here to Get Search Results !

जबरदस्त तरुण मंडळात महिलांची महाआरती

 



जबरदस्त तरुण मंडळात महिलांची महाआरती

महिला व मुलींचा उदंड प्रतिसाद



सोमवारी सकाळी सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद



नेसरी, गडहिंग्लज : वेगात वीर दौडले सात या पोवाड्याचे स्फूर्तीस्थान हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांची समाधी असलेल्या नेसरी या गावात जबरदस्त तरुण मंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाची स्थापना केली आहे. मंडळाचे गणेश स्थापनेचे हे ३८ वे वर्ष आहे.



जबरदस्त तरुण मंडळातर्फे दरवर्षी गणरायाच्या स्थापनेपासून अनंत चतुर्थी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो. आज महिलांसाठी हळदीकुंकू व महिलांकडून महाआरतीचे आयोजन केले होते. या महारतीला नेसरी गावातील महिला व मुलींनी उदंड प्रतिसाद दिला.



सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचे आयोजन मंडळातर्फे केले आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष - युवराज घाटगे, उपाध्यक्ष - दिग्विजय देसाई, खजिनदार - पवन पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने राबत असतात.






Post a Comment

0 Comments