इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज
३५ वर्षावरील
गटात अंतिम सामन्यात
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर
थरारक एका धावेने विजय
कोलंबो, ०६ ऑक्टोबर, (क्री.
प्र.) : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने
सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर
क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा,
कोलंबो, श्रीलंका येथे सुरु आहे. हि स्पर्धा
मनीष किशोर यांच्या यु प्रो. या कंपनीने व सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशनने एकत्रीत आयोजित
केली आहे. या स्पर्धेत पस्तीस वर्षांवरील पुरुष गटात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर थरारक
८९-८८ असा एका धावेने विजय मिळवला.
आज झालेल्या अंतिम
सामन्यात न्यूझीलंडच्या पस्तीस वर्षांवरील पुरुष संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या
स्किन मध्ये (चार षटके) झेन हार्टले (वजा १० धावा) व लेईथ जॉनस्टोन (१३ धावा, १
विकेट) यांनी ३ धावा केल्या. दुसऱ्या स्किन मध्ये (चार षटके) दुआन पीत्चेर (१७ धावा,
१ विकेट) व रिचर्ड फाॅस्ट (१७ धाव, २ विकेट) यांनी ३४ धावा केल्या तर तिसऱ्या स्किन
मध्ये (चार षटके) मिचेल डोडून्स्की (१३ धावा) व मॅथू वाॅर्ड (१३ धावा, १ विकेट) यांनी २६ धावा
केल्या तर चौथ्या व शेवटच्या स्किन मध्ये (चार षटके) उपकर्णधार रॉबर्ट शेरी (१५
धावा, २ विकेट) व कर्णधार डॅरीन क्रूक (१० धावा, १ विकेट) यांनी २५ धावांची भर
घालत द. आफ्रिकेला ७५ धावांचे आव्हान दिले.
यानंतर आलेल्या ऑस्ट्रेलिया
संघाने जोरदार लढत देताना पहिल्या स्किन मध्ये (चार षटके) अॅंडी ब्यर्ने (१८ धावा)
व ख्रिस प्रेस्कॉट (१५ धावा, १ विकेट)
यांनी ३३ धावा केल्या. दुसऱ्या स्किन मध्ये (चार षटके) टिम विचुरा (वजा ५ धावा) व अॅंडी
सोलोमॉन (१७ धावा, १ विकेट) यांनी १२ धावा केल्या व तिसऱ्या स्किन मध्ये (चार
षटके) आलेल्या कर्णधार जॉश गुय (३ धावा, १ विकेट) व जॉश जॉन्स ( ९ धावा) यांनी १२ धावांची
भर घातली. तर चौथ्या व शेवटच्या स्किन मध्ये (चार षटके) उपकर्णधार ब्रॅड जॉन्स (१५ धावा, १ विकेट) व स्टेफेन शाॅ (१७ धावा, १
विकेट) यांनी ३२ धावा करत विजयश्री खेचून आणली. विजयासाठी या जोडीला शेवटच्या
षटकात १४ धावांची गरज असताना स्टेफेन शाॅने ५ च्या चेंडूवर ७ (षटकार+एक धावून
काढलेली धाव) धावा मिळवत विजय आवाक्यात आणला व ब्रॅड जॉन्सने शेवटच्या चेंडूवर २
धावा घेत विजय साजरा केला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा
उपकर्णधार ब्रॅड जॉन्स व न्यूझीलंडच्या रिचर्ड फाॅस्ट यांना या सामन्यात सामनावीर
म्हणून गौरवण्यात आले.
Post a Comment
0 Comments