रविवारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा बालेवडी, पुणे येथे
मुंबई १८, ऑक्टोबर (क्री. प्र.) महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन
२०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी श्री.
शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवडी,
पुणे येथे आयोजित केली आहे. सदर वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे
अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ठीक १२:०० वाजता
होणार असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांनी
कळविले आहे. या सभेत खो-खोचा प्रचार-प्रसार व पुढील वाटचाल या बद्दल सुध्दा चर्चा
होणार असल्याचे जाधव यांनी संगितले.

Post a Comment
0 Comments