आंतर शालेय राज्य मल्लखांब स्पर्धा बोरीवलीत रंगणार
मुंबई : येत्या २८, २९ नोव्हेंबर रोजी बोरीवली (पश्चिम) येथील बिमा नगर
एज्युकेशन सोसायटीच्या मैदानात क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२०२५ या वर्षाची आंतर
शालेय राज्य मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मुंबई उपनगर
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद,
मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बीमा नगर एज्युकेशन
सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहे.
सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मल्लखांब पटू आपले कौशल्य
सादर करतील. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ विभागातील २५० पेक्षा जास्त खेळाडू ३०
पंच,
१० पदाधिकारी, २५ स्वयंसेवक सहभागी होतील. महाराष्ट्र शासनाची ही स्पर्धा
असल्यामुळे राज्यातील नामवंत शालेय मल्लखांबपटूंचा सहभाग या स्पर्धेत असणार आहे.
स्पर्धेचा अंदाजे खर्च १३ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. स्पर्धेच्या अधिक
माहितीसाठी आशिष देवल, प्रमुख कार्यवाह मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना,
मोबाईल क्रमांक ९६६४००२०५१ यांच्याशी संपर्क साधावा.
Post a Comment
0 Comments