Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा हर्षित माहिमकरला दुहेरी मुकुटाची संधी

 


महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा

हर्षित माहिमकरला दुहेरी मुकुटाची संधी

 

मुंबई, १७ नोव्हेंबर: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने तसेच ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्ट चॅम्पियन 24 द्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धेत हर्षित माहिमकरने पुरुष एकेरी आणि १७ वर्षांखालील मुले एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

 

महालक्ष्मी येथील वेलिंग्डन स्पोर्ट्स क्लब कोर्टवर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत बिनसीडेड हर्षितने कमालीचे सातत्य राखताना पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित श्वेतांक कर्णिकवर ३४ मिनिटांत 21-13, 21-10 असा विजय मिळवला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या सीडेड हर्षितने बिगरमानांकित सुमीत माडे याचा 21-16, 21-15 असा पराभव केला.

 

१७ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात चौथ्या मानांकित खुशी पाहवाने अव्वल सीडेड श्रावनी पाटीलला 18-21, 21-14, 28-26 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत खुशीने रुतू किटलेकरला 21-12, 21-12 अशी मात दिली. अंतिम फेरीत तिचे आव्हान दुसऱ्या सीडेड प्रिशा शहा हिच्याशी होईल.

 

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत हर्षितसमोर चौथ्या मानांकित सोहम फाटकचे आव्हान आहे. उपांत्य फेरीत सोहमने टॉप सीडेड तनय मेहेंदळेला 21-11, 21-8 असे सरळ गेममध्ये हरवले.

 

महिला एकेरीच्या फायनलमध्ये प्रिशा शाह आणि देवांशी शिंदे आमनेसामने आहेत. उपांत्य फेरीत प्रिशा हिने अनुष्का भिसेवर 21-16, 21-15 अशी मात केली. देवांशी शिंदे हिला श्रावणी पाटीलविरुद्ध १३-२१, २१-१७, २१-१५ असा विजय मिळवला.

  

निकाल (सर्व उपांत्य फेरी):

१७ वर्षांखालील मुली एकेरी:

Ø  खुशी पाहवा विजयी वि. 1- श्रावनी पाटील 18-21, 21-14, 28-26

 

Ø  प्रिशा शहा विजयी वि. रुतू किटलेकर 21-12, 21-12

 

१७ वर्षांखालील मुली दुहेरी:

Ø  आर्या फलाने/एनाया गोलेचा विजयी वि. आर्या मेस्त्री/खुशी पाहवा 13-21, 21-17, 24-22

 

Ø  अनन्या राणे/जाश्वी भट्ट विजयी वि. मनस्वी रणवरे/नेत्रा झालानी 21-18, 21-13

 

१७ वर्षांखालील मुले एकेरी:

Ø  तनय मेहेंदळे विजयी वि. यश गुरव 9-21, 21-17, 21-15

 

Ø  हर्षित माहिमकर विजयी वि. सुमीत माडे 21-16, 21-15

 

१७ वर्षांखालील मुले दुहेरी:

Ø  निधीश मोरे/तनय मेहेंदळे विजयी वि. अयान कपाडिया/एथन डिसूझा 21-17, 21-9

 

Ø  इशान साळवी/सुमीत माडे विजयी वि. इशान वानखेडे/तनय जोशी 21-12, 23-21

 

महिला एकेरी:

Ø  प्रिशा शहा विजयी वि. अनुष्का भिसे 21-16, 21-15

 

Ø  देवांशी शिंदे विजयी वि. श्रावणी पाटील १३-२१, २१-१७, २१-१५

 

महिला दुहेरी:

Ø  सामिया शाह/शिवानी हेर्लेकर विजयी वि. करिना मदान/मिशेल ए 21-12, 12-21, 21-10

Ø  अलका काराइल/वेदिका कुलकर्णी विजयी वि. नूपूर सहस्रबुद्धे/सोनल मोरे 17-21, 21-18, 21-19

 

पुरुष एकेरी:

Ø  सोहम फाटक विजयी वि. तनय मेहेंदळे 21-11, 21-8

 

Ø  हर्षित माहिमकर विजयी वि. श्वेतांक कर्णिक 21-13, 21-10

 

पुरुष दुहेरी:

Ø  अर्जुन सुरेश/सिद्धेश राऊत विजयी वि. दीपक जेटली/मिशील शाह 18-21, 21-10, 21-16

 

Ø  निधीश मोरे/सोहम फाटक विजयी वि. मयूर वालगुंजे/मोहित आसवानी 21-16, 22-20


Post a Comment

0 Comments