मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा
पुण्याचे क्यूईस्ट गौरव देशमुख आणि आरव संचेती बाद फेरीत
मुंबई, 17 नोव्हेंबर: पुण्याच्या गौरव देशमुख आणि आरव संचेती यांनी लीग सामने जिंकून
मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बाद फेरी गाठली.
मलबार हिल क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या
स्पर्धेत आय गटात गौरवने बेस्ट ऑफ फाइव्ह फ्रेम्स '15-रेड' स्नूकर राऊंड-रॉबिन सामन्यात
मुंबईच्या आकाश रामटेकेचा 3-0 (68-38, 96-78, 58-32) असा
पराभव केला.
बाजूच्या टेबलवर, संचेतीनेही दमदार खेळ करताना नागपूरच्या अंशुल तांडेकरला 3-0
(71(30)-24, 62-45, 58-9) असे हरवले. गौरवने तीन विजयांसह गटात
अव्वल स्थान राखले, तर संचेतीला दुसरे स्थान मिळाले.
दरम्यान, मुंबईचा
अनुभवी क्यूईस्ट खेळाडू चेराग रामकृष्णनने आपला पूर्वीचा फॉर्म दाखवत
मराठवाड्याच्या चेतन राजरवालला 3-0 (60-51, 78-21, 66-26) अशा
फरकाने पराभूत केले.
नागपूरच्या जुबेर शेखने मुंबईच्या सुनील जैनवर 3-1 (58-26, 59-51, 34-74, 69(48)-14) अशी
मात केली. के गटात झुबेर आणि चेरागने अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवून बाद
फेरीत प्रवेश केला.
पुण्याचा अभिजीत रानडेने सर्वोत्तम फॉर्म कायम राखत अभिषेक
बजाजवर 3-0 (75(44)-51, 62-36, 71-29) असा विजय
मिळवला. रानडे आणि बजाज या दोघांनीही आय गटात अव्वल दोन क्रमांकांसह आगेकूच केली.
इतर निकाल - 15-रेड स्नूकर राऊंड-रॉबिन लीग फेरी:
- गौरव देशमुख
(पुणे) विजयी वि. आकाश रामटेके (मुंबई) 3-0 (68-38, 96-78, 58-32)
- आरव संचेती
(पुणे) विजयी वि. अंशुल तांडेकर (नागपूर) 3-0 (71(30)-24, 62-45, 58-9)
- चेराग
रामकृष्णन (मुंबई) विजयी वि. चेतन राजरवाल (मराठवाडा) 3-0 (60-51, 78-21, 66-26)
- झुबेर शेख
(नागपूर) विजयी वि. सुनील जैन (मुंबई) 3-1 (58-26, 59-51, 34-74, 69(48)-14)
- सुमेर मागो
(पुणे) विजयी वि. ऋषभ जैन 3-0 (57-49,
76-32, 49-5)
- अभिजीत
रानडे (पुणे) विजयी वि. अभिषेक बजाज (पुणे) 3-0 (75(44)-51, 62-36, 71-29)
- रोहित रावत
(पुणे) विजयी वि. कृष्णा तोहगावकर (ठाणे) 3-2 (9-59, 60-52, 48-32, 39-63, 64-44)
- आदित्य
शांडिल्य (पुणे) विजयी वि. अनंत मेहता (मुंबई) 3-1 (83-17, 62-49, 54-61, 74-42)
फोटो ओळ: संचेती:
आरव संचेतीने नागपूरच्या अंशुल तांडेकरला 3-0 असा पराभव केला.
Post a Comment
0 Comments