108वी स्पिनी-पुरुषोत्तम ढाल क्रिकेट स्पर्धा
अदतराव, वाघेलाच्या शतकांच्या जोरावर हिंदू जिमखान्याचा मोठा विजय
मुंबई : सिद्धांत अदतराव (150 धावा) आणि गौतम वाघेला (112 धावा) यांच्या दमदार शतकांच्या जोरावर यजमान पी. जे. हिंदू
जिमखाना संघाने 108व्या स्पिनी-पुरुषोत्तम ढाल क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात
क्रिकेट क्लब ऑफ इंडियावर 113 धावांनी मोठा विजय मिळवला.
शनिवारी हिंदू जिमखाना मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम
फलंदाजी करताना हिंदू जिमखाना संघाने 45 षटकांत 8 बाद 389 धावांचा डोंगर उभा केला. प्रारंभीच्या तीन फलंदाजांना 5.3
षटकांत केवळ 31 धावांत गमावल्यानंतर अदतराव आणि वाघेला यांनी आक्रमक खेळ
करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
अदतरावने 96 चेंडूंमध्ये 18 चौकार आणि 6 षटकार मारत शानदार दीडशतकी खेळी साकारली,
तर वाघेलाने 89 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने
चांगली लढत दिली. रुद्र दंडे (50), आकाश पारकर (47), चिन्मय सुतार (45), आणि अखिल हेरवाडकर (42) यांनी योगदान दिले, मात्र संघाचा डाव 38.4 षटकांत 276 धावांवर आटोपला, आणि हिंदू जिमखान्याने सामना सहज जिंकला.
संक्षिप्त धावफलक:
पी. जे. हिंदू जिमखाना: 45 षटकांत 8 बाद 389 (सिद्धांत अदतराव 150 (96 चेंडू, 18 चौकार, 6 षटकार), गौतम वाघेला 112 (89 चेंडू, 13 चौकार, 2 षटकार), कौशिक चिकलीकर 27)
वि. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया:
38.4 षटकांत सर्वबाद 276 (रुद्र दंडे 50, आकाश पारकर 47, चिन्मय सुतार 45, अखिल हेरवाडकर 42)
निकाल: हिंदू जिमखाना 113 धावांनी विजयी.
मिग क्रिकेट क्लब: 44.3 षटकांत सर्वबाद 331 (ओम केशकामत 102, हितेश चौहा 67, अथर्व अंकोलेकर 47; धनय पारेख 3/66)
वि. गोरेगाव एससी: 23 षटकांत सर्वबाद 105 (श्रीयांश राय 35; अथर्व अंकोलेकर 5/6)
निकाल: मिग क्रिकेट क्लब 226 धावांनी विजयी.
जॉन ब्राइट सीसी: 24.3 षटकांत सर्वबाद 137 (अथर्व बांगर 31, हार्दिक कुरंगळे 29; अजिंक्य देशमुख 5/36)
वि. मुंबई पोलिस जिमखाना: 22.4 षटकांत 4 बाद 143(तनिश मेहेर 41, चिंतामणी कांबळे 32)
निकाल: मुंबई पोलिस जिमखाना 6 विकेट राखून विजयी.
Post a Comment
0 Comments