चंद्रकांत पंडित सीसी अकॅडमी आयोजित 14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा
खंडाळा सीसीचा मुलुंड चॅलेंजर्सवर 170 धावांनी दणदणीत विजय
मुंबई, 4 डिसेंबर: वनडाऊन फलंदाज ओजस मल्लापूरकरच्या शानदार शतकाच्या जोरावर खंडाळा सीसीने चंद्रकांत पंडित सीसी अकॅडमी आयोजित 14
वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत मुलुंड चॅलेंजर्सचा 170
धावांनी पराभव केला.
बुधवारी क्रॉस मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात ओजसने 117 चेंडूंमध्ये 12 चौकारांसह 103 धावांची खेळी केली. त्याच्या या प्रभावी खेळीच्या जोरावर खंडाळा सीसीने 45 षटकांत 9 बाद 263 धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुलुंड चॅलेंजर्सचा डाव 31.4
षटकांत अवघ्या 93 धावांवर संपला. त्यांच्या फलंदाजांपैकी केवळ सिद्धेश पिळणकरने (23 धावा) दोन आकडी धावा केल्या. खंडाळा सीसीकडून औथ सोनावणेने 16
धावांत 3 विकेट्स घेत सामन्यात चमकदार कामगिरी केली.
संक्षिप्त धावफलक:
खंडाळा सीसी: 45 षटकांत 9 बाद 263
ओजस मल्लापूरकर 103 [117 चेंडू, 12 चौकार],
युवान सुर्वे 25, मानस शिवलकर 25; प्रणव शेट्टी 2/34
मुलुंड चॅलेंजर्स: 31.4 षटकांत सर्वबाद 93
सिद्धेश पिळणकर 23; औथ सोनावणे 3/16)
Post a Comment
0 Comments