महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर 2024
शाबाज खानला हरवून रायन राझमी विजेता
मुंबई : मलबार हिल क्लबच्या बिलियर्ड्स हॉलमध्ये झालेल्या अंतिम
फेरीत,
रायन राझमीने चुरशीच्या लढतीत शाबाज खानचा 5-4
असा पराभव करत मलबार हिल क्लब महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स
आणि स्नूकर स्पर्धेच्या पुरुषांच्या 15-रेड स्नूकर प्रकाराचे विजेतेपद पटकावले.
अत्यंत चुरशीच्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी सरस कामगिरी
केली. शाबाजने 58 गुणांचा
शानदार ब्रेक करत पहिली फ्रेम जिंकून सामन्याची प्रभावी सुरुवात केली. रायनने
दुसऱ्या फ्रेममध्ये 48 गुणांचा ब्रेक करून बरोबरी साधली. तिसऱ्या फ्रेममध्ये शाबाजने 73
चा अप्रतिम ब्रेक करत पुन्हा आघाडी घेतली. रायनने चौथी
फ्रेम जिंकत सामन्यात बरोबरी केली, परंतु पाचव्या फ्रेममध्ये शाबाजने नजाकतपूर्ण खेळ करत
पुन्हा आघाडी घेतली.
त्यानंतर रायनने शांतचित्ताने खेळ करत सलग दोन फ्रेम्स
जिंकून 4-3
अशी आघाडी घेतली. मात्र, शाबाजने आठवी फ्रेम जिंकून सामना निर्णायक फ्रेमपर्यंत
नेला. अंतिम फ्रेममध्ये रायनने संयम राखत 44 गुणांचा निर्णायक ब्रेक केला आणि 13-76,
61-31, 11-79, 75-34, 49-61, 52-22, 58-34, 42-56, 62-19 अशा फ्रेम स्कोअरसह सामन्यात बाजी मारली.
निकाल:
स्नूकर 15-रेड – अंतिम फेरी:
रायन राझमी विजयी वि. शाबाज खान 5-4
(13-76(58), 61(48)-31, 11-79(73), 75-34, 49-61, 52-22, 58-34, 42-56,
62(44)-19).
तिसरे स्थान:
आदित्य मेहता विजयी वि. सुमेर मगो 3-2
(60-37, 77-1, 42(42)-67(55), 7-116(102), 70-35).
बिलियर्ड्स – पहिली फेरी: ध्रुव सितवाला विजयी वि. अक्षय गोगरी 3-0, रोहन जंबुसारिया विजयी वि. आर्यन परुळेकर 3-0, विशाल मदान विजयी वि. हितेश कोटवानी 3-2, देवेंद्र जोशी विजयी वि. राजीव शर्मा 3-0, रायन राझमी विजयी वि. लौकिक पठारे 3-0, ऋषभ ठक्कर विजयी वि. महेश जगदाळे 3-0, शाहयान राझमी विजयी वि. अरुण अग्रवाल 3-0, सिद्धार्थ पारिख विजयी वि. मनन शाह 3-1
फोटो ओळ:
रायन राझमीने शाबाज खानचा 5-4 असा पराभव करत 15-रेड स्नूकर प्रकाराचे विजेतेपद पटकावले.
Post a Comment
0 Comments