मुंबईच्या करमरकर दाम्पत्याने जिंकली प्राइम मिश्र जोडी ब्रिज स्पर्धा
मुंबई: प्राइम सिक्युरिटीज प्रायोजित प्राइम-ब्रिज स्पर्धा 2024 मध्ये मुंबईच्या मरियाना आणि संदीप करमरकर या दांपत्याने मिश्र जोडी प्रकारात शानदार कामगिरी करत जेतेपद पटकावले.
बॉम्बे जिमखाना येथे आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीत करमरकर दांपत्याने 1431 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर आपली मोहर उमटवली. मुंबईचेच हिमानी आणि राजीव खंडेलवाल यांनी 1388 गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर अहमदाबादच्या नीना शाह आणि कौस्तुभ देवधर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
मुख्य फेरीसाठी पात्र ठरू न शकलेल्या स्पर्धकांसाठी आयोजित स्ट्रॅटा जोडी स्पर्धेत दीपिका मेहता आणि रवी कौल यांनी विजेतेपद पटकावले, तर अलका क्षीरसागर आणि इव्हान अल्फोन्सो हे उपविजेते ठरले.
Post a Comment
0 Comments