३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
महाराष्ट्राकडून कर्नाटकचा धुव्वा, उपांत्य
फेरीत प्रवेश
हल्दवानी, क्री. प्र. ३० : उत्तराखंडच्या
हल्दवानी येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व
महिला संघांनी दमदार कामगिरी करत कर्नाटकवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश
निश्चित केला.
पुरुष गट: महाराष्ट्रचा दमदार विजय
हल्दवानी क्रीडांगणावर झालेल्या पुरुष खो-खो सामन्यात
महाराष्ट्राने कर्नाटकचा एक डाव आणि १२ गुणांनी (३४-२२) पराभव केला. महाराष्ट्राच्या विजयात कर्णधार
गजानन शेंगाळ (२.३० मिनिटे संरक्षण, २ गुण), शुभम थोरात (१.४० मिनिटे आणि २.०५ मिनिटे संरक्षण, ६
गुण), रामजी कश्यप (१.३५ मिनिटे संरक्षण, ६
गुण), सौरभ आडावकर (१.४५ मिनिटे संरक्षण, २
गुण) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नाटकच्या
संघाकडून संघप्पा (१.१० मिनिटे संरक्षण, २
गुण) आणि गौतम एम. के (६ गुण) यांनी चांगला खेळ केला, पण महाराष्ट्राच्या आक्रमक खेळासमोर तो तोकडा पडला.
महिला गट: चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राची बाजी
महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने चुरशीच्या सामन्यात कर्नाटकवर
६ गुणांनी (३२-२६) विजय मिळवला. या
सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात प्रियांका इंगळे (२ मिनिटे संरक्षण, २
गुण), संध्या सुरवसे (२ मिनिटे व १.२० मिनिटे संरक्षण, ४
गुण), संपदा मोरे (०.५० मिनिटे संरक्षण, १६
गुण), गौरी शिंदे (१.३० मिनिटे व १.४० मिनिटे संरक्षण, २
गुण), अश्विनी शिंदे (१.३० मिनिटे व १.३० मिनिटे संरक्षण) यांनी महत्त्वाची
भूमिका बजावली. कर्नाटक संघाकडून मोनिका (१.२० मिनिटे व
१.४० मिनिटे संरक्षण, ६ गुण), चित्रा बी. (२.१० मिनिटे संरक्षण, ४
गुण), तेजस्विनी के. आर. (१.३० मिनिटे व १.२० मिनिटे संरक्षण) यांनी झुंजार खेळ
केला, पण
महाराष्ट्राच्या खेळाडूंसमोर त्यांचा प्रतिकार कमी पडला.

Post a Comment
0 Comments