Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची सुवर्ण हॅटट्रिक! महाराष्ट्राचा दबदबा कायम! 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवत ऐतिहासिक हॅटट्रिकची नोंद - नामदेव शिरगावकर

 


राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची सुवर्ण हॅटट्रिक!

महाराष्ट्राचा दबदबा कायम! 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवत ऐतिहासिक हॅटट्रिकची नोंद - नामदेव शिरगावकर

 


डेहराडून:
महाराष्ट्राने 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. अहमदाबाद आणि गोवा स्पर्धेनंतर उत्तराखंडमध्येही अव्वल स्थान मिळवत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा इतिहासात सुवर्ण हॅटट्रिकची कामगिरी केली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी हा अभिमानास्पद क्षण घोषित करत महाराष्ट्राच्या खेळाडूंना कौतुकाचा सलाम केला.

 



महाराष्ट्राची पदकांची लयलूट – 198 पदके!

या स्पर्धेत महाराष्ट्राने 54 सुवर्ण, 71 रौप्य आणि 73 कांस्य पदकांची कमाई करत एकूण 198 पदकांसह अव्वल संघाचा मान मिळवला. ही राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली.

 

देशभरात महाराष्ट्राचा जयघोष!

नामदेव शिरगावकर म्हणाले, "महाराष्ट्राच्या पदकविजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळवत इतिहास घडवला आहे. जवळपास 200 पदकांचा टप्पा पार करणारा महाराष्ट्र हा देशातील एकमेव संघ ठरला असून पुन्हा एकदा जय महाराष्ट्राचा जयघोष संपूर्ण देशात घुमला आहे!"

 

महाराष्ट्र क्रीडा विश्वासाठी सुवर्णक्षण!

या कामगिरीमुळे महाराष्ट्र क्रीडा क्षेत्राला मोठी प्रेरणा मिळाली आहे. खेळाडूंच्या जिद्दीला, मेहनतीला आणि राज्य सरकारच्या पाठिंब्याला ही यशस्वी कामगिरी लाभली आहे. महाराष्ट्रचा हा विजय भारतीय क्रीडा विश्वात नव्या ऊर्जेने प्रेरणा देणारा ठरला आहे!

 


Post a Comment

0 Comments