Type Here to Get Search Results !

ध्रुव भालेरावने जिंकला श्री उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेचा किताब!

 


ध्रुव भालेरावने जिंकला श्री उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेचा किताब!


मुंबई: श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती, मुंबई आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत अँटोनिओ दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा राष्ट्रीय स्तरावरील सब-ज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेरावने विजेतेपद पटकावले.

 

अचूकतेचा आणि कौशल्याचा शानदार खेळ!

अचूक आणि योग्य वेळी मारलेल्या फटक्यांच्या जोरावर ध्रुव भालेरावने आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेचा १७-१ अशा एकतर्फी फरकाने पराभव करत अजिंक्यपद मिळवले. अंतिम फेरीत आक्रमक खेळ करत धडक मारलेल्या नील म्हात्रेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

 

🏅 भव्य पारितोषिक वितरण सोहळा

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला समितीचे विश्वस्त मधुकर प्रभू, व्यवस्थापक संजय आईर, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण उपस्थित होते.

 

🔹 इतर उल्लेखनीय कामगिरी:

माघी श्री उद्यानगणेश जन्मोत्सवानिमित्त शिवाजी पार्क येथील श्री उद्यानगणेश मंदिर परिसरात आयोजित विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत खालील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली –

 

🏆 उपांत्यफेरी गाठलेले खेळाडू:

  • निखील भोसले (CES मायकल हायस्कूल, कुर्ला)
  • केवल कुळकर्णी (शेठ करमशी कानजी स्कूल, मुलुंड)

 

🏆 उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडू:

  • पुष्कर गोळे (पोद्दार अकॅडमी स्कूल, मालाड)
  • वेदांत पाटणकर आणि सारा देवन (आयईएस पाटकर विद्यालय, डोंबिवली)
  • ग्रीष्मा धामणकर (व्ही. एन. सुळे गुरुजी हायस्कूल, दादर)

 

🏆 उपउपांत्यपूर्व फेरीतील खेळाडू:

  • विश्वेत बिजोतकर (हिरानंदानी फाउंडेशन स्कूल, ठाणे)
  • सोहम जाधव (शारदाश्रम विद्यामंदिर, दादर)
  • केतकी मुंडल्ये आणि निधी सावंत (पाटकर विद्यालय, डोंबिवली)
  • उमैर पठाण (श्री नारायण गुरु हायस्कूल, चेंबूर)
  • तीर्थ ठाकर (ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल, दहिसर)
  • प्रसन्न गोळे (पोद्दार अकॅडमी स्कूल, मालाड)
  • शेवांश नाके (युनिव्हर्सल स्कूल, ठाणे)

 

🥇 सर्व उपउपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

विशेष गौरव आणि व्यवस्था:

  • सर्व सहभागी खेळाडूंना मोफत टी-शर्ट आणि अल्पोपहार देण्यात आला.
  • स्पर्धेचे पंच म्हणून सचिन शिंदे, संतोष जाधव, आणि ओमकार चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
  • समितीचे कार्यवाह डॉ. अरुण भुरे, विश्वस्त किरण पाटकर आणि अविनाश नाईक यांनी शालेय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे विशेष कौतुक केले.

Post a Comment

0 Comments