प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा
वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीचा शानदार विजय!
मुंबई: माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब आणि शिवाजी पार्क
जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या क्रिकेटपटू स्व. प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२०
क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब आणि एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी
विजयाची सलामी दिली.
🔥 वेंगसरकर फाउंडेशनचा दणदणीत विजय!
सलामीवीर पूनम राऊत (३९ चेंडूत नाबाद ५३) आणि सारा सामंत (२६ चेंडूत
नाबाद ५१) यांच्या अभेद्य ११२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर
दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचा १० विकेट्सनी पराभव
केला.
💯 अचल वळंजूचे नाबाद शतक!
राजावाडी क्रिकेट क्लबच्या अचल वळंजूने ७२ चेंडूत १८ चौकारांसह नाबाद १०५ धावा
फटकावत पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनवर ३० धावांनी विजय
मिळवला.
🏏 एमआयजी क्रिकेट क्लबने रोमांचक विजय मिळवला!
महेक मिस्त्री (४८ चेंडूत ५०) आणि अनिशा रौत (३८ चेंडूत ५१) यांच्या दुसऱ्या
विकेटसाठी १०१ धावांच्या भागीदारीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने ६ बाद १४४
धावांचे आव्हान उभे केले. मध्यमगती गोलंदाज जुही रावतने १५ धावांत ३ बळी
घेतले. माटुंगा जिमखान्याने जुही रावत (५१) आणि गार्गी बांदेकर (४२) यांच्या
खेळीमुळे १८ व्या षटकात १ बाद १२० धावा केल्या, पण शेवटी एमआयजीच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत १३
धावांनी सामना जिंकला. अनिशा
रौतने १९ धावांत ३ बळी घेतले, तर महेक मिस्त्रीने १८ धावांत २ बळी घेतले.
🔹 अन्य सामन्यात:
किंजल कुमारीच्या २६ चेंडूत नाबाद ४२ धावांच्या
फटकेबाजीमुळे साईनाथ स्पोर्ट्स क्लबने पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा ११ धावांनी पराभव केला.
🏏 शानदार उद्घाटन सोहळा!
स्पर्धेचे उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे
पार पडले. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संजय नाईक आणि जनरल सेक्रेटरी अभय
हडप उपस्थित होते.
महिला क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा मोठे व्यासपीठ ठरत आहे,
जिथे भविष्यातील तारे चमकत आहेत!

Post a Comment
0 Comments