नेरळ येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य कबड्डी
प्रशिक्षण शिबिर
नेरळ – शालेय विद्यार्थ्यांमध्ये कबड्डी खेळाची गोडी
निर्माण करून त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी सचिंद्र आयरे फाऊंडेशन आणि विद्या विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर
यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे
आयोजन करण्यात आले आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ब्राम्हण आळी, नेरळ, ता. कर्जत, जिल्हा रायगड येथे हे शिबिर पार पडणार आहे. सकाळी ०९:०० ते ११:०० आणि दुपारी ०४:०० ते ०६:००
अशा दोन सत्रांमध्ये हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
वय वर्ष ०९ ते १४ या वयोगटातील निवडक विद्यार्थ्यांना या शिबिरात सहभागी होता
येणार आहे. खेळाच्या तंत्रशुद्ध शिक्षणाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती,
आहार नियोजन आणि योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी
या क्षेत्रातील नामांकित
तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शिबिरामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊळ,
पुणेरी फलटणचे माजी खेळाडू व
दिल्ली दबंगचे फिटनेस ट्रेनर संग्राम मांजरेकर, डायेटिशियन दीपाली मुसळकर,
तसेच योग व आहार तज्ज्ञ मधुकर आयरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराच्या आयोजनाची माहिती
मुख्याध्यापिका विनया काकडे,
मुख्याध्यापिका शैलजा
निकम तसेच फाऊंडेशनचे सचिव सचिंद्र आयरे यांनी एका संयुक्त पत्राद्वारे सर्व प्रसारमाध्यमांना दिली
आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कबड्डी खेळाची आवड निर्माण होऊन त्यांना
योग्य प्रशिक्षण मिळावे आणि भविष्यात जिल्हा तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये
त्यांना संधी मिळावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे
कबड्डीप्रेमी विद्यार्थ्यांनी या
सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments