Type Here to Get Search Results !

गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेत हिंदुजाचे वर्चस्व – प्लेट गटात विजेतेपदावर मोहोर!


 

गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा 

आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेत हिंदुजाचे वर्चस्व – प्लेट गटात विजेतेपदावर मोहोर!


मुंबई : वानखेडे स्टेडियमवर झालेल्या गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटाच्या अंतिम सामन्यात हिंदुजा हॉस्पिटलने ग्लेनेलगेसचा ८० धावांनी धुव्वा उडवत विक्रमी १८वे विजेतेपद पटकावले. दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर हिंदुजाने सहज विजय मिळवला.

 

हिंदुजाची आक्रमक फलंदाजी – १४१ धावांचे भक्कम आव्हान!

पहिली फलंदाजी करताना हिंदुजाने २० षटकांत ६ बाद १४१ धावा केल्या. नंदू पाटीलने शानदार अर्धशतक (५० धावा) ठोकले. भूषण वैद्य (२१), कर्णधार जितू परदेशी (१९), अद्वैत मुद्रस (११) आणि विजय यादव (१३) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ग्लेनेलगेसकडून शिवम आणि निलेश यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

 

हिंदुजाची गोलंदाजी – ग्लेनेलगेसचा डाव ६१ धावांत गुंडाळला!

हिंदुजाच्या भेदक माऱ्यासमोर ग्लेनेलगेसचा डाव १४ षटकांत अवघ्या ६१ धावांत आटोपला. प्रशांत हिरोजीने ४ बळी घेत आघाडीवर राहिला. नंदू पाटील आणि विजय यादवने प्रत्येकी २ बळी घेतले. सनी तांबोळी आणि जितू परदेशी यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.

सामनावीर – नंदू पाटील!

अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या नंदू पाटीलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हिंदुजाच्या शानदार विजयाने त्यांच्या क्रिकेट वर्चस्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे!

Post a Comment

0 Comments