Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहिर

 


राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहिर

 

मुंबई, ११ मार्च: आगामी ५२ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दिल्लीच्या तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये १७ ते २१ मार्च २०२५ दरम्यान आयोजित केली जाणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्राचा पुरुष आणि महिला संघ निवडण्यात आले आहेत.

 

गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राचा संघ अंतिम रूपात निवडला गेला आहे. संघाच्या तयारीसाठी १२ ते १४ मार्च २०२५ या कालावधीत ३ दिवसांचे सराव शिबीर मुंबईतील एम. सी. ए. ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर येथे आयोजित करण्यात आले आहे.

 

१५ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राचा संघ राजधानी एक्सप्रेसने दिल्लीसाठी रवाना होणार आहे. संघाला महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने वातानुकूलित प्रवास व्यवस्था, भत्ता आणि गणवेश प्रदान करण्यात आले आहेत.

 

महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे:

 

पुरुष संघ : १) विकास धारिया, संजय मांडे, फहिम काझी ( सर्व मुंबई ) सागर वाघमारे ( पुणे ), पंकज पवार ( ठाणे ), रिझवान शेख ( मुंबई उपनगर ) आणि संजय देसाई ( संघ व्यवस्थापक ). 

 

महिला संघ : मधुरा देवळे, चैताली सुवारी ( ठाणे ), केशर निर्गुण, दीक्षा चव्हाण ( सिंधुदुर्ग ), रिंकी कुमारी, सिमरन शिंदे ( मुंबई ) आणि प्राची जोशी ( संघ व्यवस्थापक ).

 

महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सज्ज असून, यापूर्वीच्या कॅरम स्पर्धांमध्ये त्यांच्या शानदार कामगिरीचा वारसा कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.


Post a Comment

0 Comments