हिरक मोहत्सवी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२५
पुरुषांमध्ये पुणे विरुद्ध मुंबई उपनगर तर महिलांमध्ये धाराशिव
विरुद्ध सांगली यांच्यात अंतिम लढत
शेवगाव, ता.
१६ : येथील खंडोबा मैदानावर सुरू असलेल्या हिरकमहोत्सवी
पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात
चुरस पाहायला मिळणार आहे. पुरुष गटात पुणे विरुद्ध मुंबई उपनगर तर महिला गटात
धाराशिव विरुद्ध सांगली यांच्यात अंतिम सामन्यांची लढत रंगणार आहे.
पुरुष गटातील उपांत्य फेरीतील चुरशीचे सामने
पहिल्या उपांत्य सामन्यात पुण्याने सांगलीचा १ गुण व ५
मिनिटे ३० सेकंद राखून (१८-१७) पराभव केला. पुणे संघात शुभम थोरात (१.३०, १.३० मि. संरक्षण व ४ गुण), रुद्र थोपटे (५ गुण), शिवराम शिंगाडे (१, ३ मि. संरक्षण) यांनी महत्वाची भूमिका बजावली. सांगलीतर्फे मिलिंद चावरेकर
(१.१० मि. संरक्षण व ६ गुण) याने आक्रमक खेळ करत संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न
केला. त्याला अभिषेक केरीपाळे (१.२० मि. व ३ गुण) याची चांगली साथ मिळाली. सांगली
संघाने पहिल्या डावात आक्रमक खेळ केला, मात्र मध्यंतरानंतर
ते सातत्य राखू शकले नाहीत.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने धाराशिवचा ७
गुणांनी (२०-१३) पराभव केला. मध्यंतराला मुंबई उपनगर संघाकडे ३ गुणांची (१०-७)
आघाडी होती, जी धाराशिव मोडीत
काढू शकला नाही. विजयी संघात अनिकेत चेंदवणेकर (१.४०, १.३०
मि. संरक्षण व ३ गुण), ऋषिकेश मुरचावडे (१.३०, १.२० मि. संरक्षण व ३ गुण), ओंकार सोनवणे (२ मि.
संरक्षण व ३ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. धाराशिव संघात सचिन पवार (१.३०,
१ मि. संरक्षण), रवी वसावे (१.३०, ०.५० मि. संरक्षण व १ गुण), सोहन गुंड (५ गुण) यांनी
चांगली कामगिरी केली. त्यामुळे अंतिम सामना पुणे विरुद्ध मुंबई उपनगर संघात रंगणार
आहे.
महिला गटातील अंतिम सामना धाराशिव विरुद्ध सांगली
महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात धाराशिव संघाने
पुण्याचा १ गुण व ७.५० मिनिटे राखून (१०-९) पराभव केला. धाराशिव संघात अश्विनी
शिंदे (२.२०, २.१० मि. संरक्षण),
संपदा मोरे (२.१०, १.५० मि. संरक्षण व १ गुण),
संध्या सुरवसे (१, २.५० मि. संरक्षण व १ गुण),
सुहानी धोत्रे (१.१०, १ मि. नाबाद संरक्षण व ४
गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. पुणे संघात
दिपाली राठोड (१.३० मि. संरक्षण व २ गुण), ऋतिका राठोड (१.५०
मि. संरक्षण), कोमल धारवाडकर (१.२० मि. संरक्षण) यांनी
उत्कृष्ट प्रयत्न केला पण विजय मिळवू शकल्या नाहीत.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात सांगलीने नाशिकचा १ गुण व १ मिनिट
राखून (१२-११) विजय मिळवला. सांगली संघात सानिका चाफे (३ मि., ३.४० मि. संरक्षण व १ गुण), रिया चाफे (१.३०, १ मि. संरक्षण व १ गुण), प्रतीक्षा बिराजदार (१ मि., २.४० मि. संरक्षण व १
गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. नाशिक संघात कौशल्या पवार (१, २.३० मि. संरक्षण व ४ गुण), सरिता दिवा (१.२०,
१.५० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला.
विशाल भिंगारदिवे (सांगली), नंदिनी धुमाळ ( मुंबई), मंदार कोळी
(ठाणे), जगदीश दवणे (पालघर ) हि निवड समिती या स्पर्धेतून
राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवड करणार आहेत.
Post a Comment
0 Comments