Type Here to Get Search Results !

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज धम्मिका प्रसाद ओमटेक्स फास्ट बॉलिंग फाउंडेशनचा मुख्य प्रशिक्षक - टॅलेंट हंट निवडचाचण्या १८ मार्चला


श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज धम्मिका प्रसाद ओमटेक्स फास्ट बॉलिंग फाउंडेशनचा मुख्य प्रशिक्षक टॅलेंट हंट निवडचाचण्या १८ मार्चला

 

मुंबई१५ मार्च: श्रीलंकेचा प्रसिद्ध वेगवान गोलंदाज धम्मिका प्रसाद यांची ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी फास्ट बॉलिंग फाउंडेशनचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

एका अभूतपूर्व उपक्रमातसफाळे येथील ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिट्यूटतर्फे ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी फास्ट बॉलिंग फाउंडेशन लॉन्चिंग वेळी ही घोषणा करण्यात आली.

 

या फाउंडेशनमध्ये युवा वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रसाद यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

फाउंडेशनचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याचा मला सन्मान आणि अभिमान आहेमी माझा अनुभव आणि ज्ञान प्रतिभावान तरुणांसोबतभारतीय क्रिकेटच्या भविष्याशी शेअर करण्यास उत्सुक आहे,” असे धम्मिका म्हणाले.

 

चांगले वेगवान गोलंदाज निर्माण करणे आहेहे फाउंडेशनचे उद्दिष्ट असल्याचे ओमटेक्स आयसीडब्ल्यूसीचे संस्थापक विजय पटेल यांनी यावेळी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले

 

तरुणांना गुणवान वेगवान गोलंदाज बनण्याची संधी प्रदान करणेहा या फाउंडेशनची सुरुवात करण्याचा उद्देश असून आमचे लक्ष मूलभूत गोष्टीफिटनेस पातळीकौशल्य पातळीमानसिकताबायोमेकॅनिक्स आणि मानसिक स्थिरता यावर असेल,” पटेल म्हणाले.

 

ओमटेक्स आयसीडब्ल्यूसीतर्फे १८ मार्च रोजी सफाळे येथील त्यांच्या सुविधा केंद्रात १५ वर्षांवरील मुला-मुलींसाठी टॅलेंट हंट स्कॉलरशिप प्रोग्राम (निवडचाचण्याआयोजित करणार आहेस्थानिक प्रशिक्षकांच्या टीमसह मुख्य प्रशिक्षक हे ३०-४० प्रशिक्षणार्थींची निवड करतीलफाउंडेशनमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.

 

एकदिवसीय शिष्यवृत्ती कार्यक्रम सकाळी .३० वाजल्यापासून ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिट्यूट मैदानतांदुळवाडी, (पूर्वसफाळे येथे आयोजित केला जाणार आहेअधिक माहितीसाठी +९१९३२१४३८७२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

भारतीय क्रिकेटचे भविष्यातील स्टार बनण्याची क्षमता असलेल्या तरुण वेगवान गोलंदाजांना ओळखणे आणि त्यांचे संगोपन करणे आहेहे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहेहा कार्यक्रम उच्च स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या आशादायक तरुण वेगवान गोलंदाजांना शोधणे आणि त्यांचे संगोपन करण्याचा प्रयत्न करतो.

 

धम्मिका प्रसाद आपल्या समर्पित संघासह संघाचे नेतृत्व करत असल्यानेउदयोन्मुख गोलंदाजांना जागतिक दर्जाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कौशल्य सुधारण्याची अतुलनीय संधी आहेसज्ज व्हाक्रिकेटच्या मंचावर चमकण्याची ही तुमच्यासाठी संधी असू शकते!

 


Post a Comment

0 Comments