महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा २०२५-२६ सालचा कार्यक्रम जाहिर
मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने सन २०२५-२६ साठीच्या
क्रीडा कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या वर्षी जवळपास १७ पेक्षाही अधिक राज्य
स्तरीय कॅरम स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्रभर करण्यात येणार आहे. या सर्व
स्पर्धांमध्ये सुरको किंग कॅरम बोर्ड व सिस्का लिजेंड सोंगट्यांचा वापर केला जाणार
असून विजेत्या खेळाडूंना एकूण २० लाख रुपयांचे रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धांचा आयोजन विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार असून
मुंबई,
ठाणे, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, जळगाव, पालघर, रायगड आणि सिंधुदर्ग जिल्ह्यात या स्पर्धा होणार आहेत.
२०२५-२६ साठीच्या कार्यक्रमाची माहिती:
1.
एप्रिल
२०२५ – शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
2.
एप्रिल
२०२५ – बोरिवली, मुंबई
येथे १० वी एम. सी. एफ. राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
3.
मे
२०२५ – रत्नागिरी येथे आमदार चषक राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
4.
मे
२०२५ – मुंबई येथे अंपायर चर्चा सत्र.
5.
जून
२०२५ – न्यू बॉंबे स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी, जिल्हा ठाणे येथे राज्य मानांकन स्पर्धा.
6.
जून
२०२५ – नरसोबावाडी, कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
7.
जुलै
२०२५ – चेंबूर, मुंबई
येथे ४ थी चेंबूर जिमखाना आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
8.
जुलै
२०२५ – जळगाव येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
9.
ऑगस्ट
२०२५ – सनीज वर्ल्ड, पुणे येथे ३ री विनायक निम्हण स्मृती राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
10. सप्टेंबर २०२५ – कणकवली, सिंधुदुर्ग येथे २ री पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम
स्पर्धा.
11. सप्टेंबर २०२५ – वांद्रे, मुंबई येथे ३ री एम. आय. जी. क्रिकेट क्लब आयोजित राज्य
मानांकन कॅरम स्पर्धा.
12. ऑक्टोबर २०२५ – पाचगणी - महाबळेश्वर,
सातारा येथे ५९ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा.
13. नोव्हेंबर २०२५ – मुंबई येथे ३ री एम. आय. जी. क्रिकेट क्लब
आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
14. नोव्हेंबर २०२५ – जळगाव येथे ५९ वी जुनियर राज्य अजिंक्यपद
कॅरम स्पर्धा.
15. नोव्हेंबर २०२५ – नाशिक येथे ५९ वी सब जुनियर राज्य
अजिंक्यपद कॅरम स्पर्धा.
16. डिसेंबर २०२५ – मुंबई येथे सब जुनियर व जुनियर मुला
मुलींसाठी प्रशिक्षण शिबिर.
17. डिसेंबर २०२५ – पालघर / रायगड येथे कार्यकर्ता चर्चा सत्र.
18. जानेवारी २०२६ – घाटकोपर, मुंबई येथे ३ री जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
19. फेब्रुवारी २०२६ – शिवाजी पार्क,
मुंबई येथे १७ वी शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम
स्पर्धा.
20. मार्च २०२६ – विलेपार्ले, मुंबई येथे ६ वी रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर,
मुंबई राज्य मानांकन कॅरम स्पर्धा.
हे कार्यक्रम महाराष्ट्रातील कॅरम प्रेमी आणि खेळाडूंना एक
मोठा संधी देणार असून कॅरम खेळाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका साकार
होईल,
असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment
0 Comments