एमसीएफ राज्य कॅरम स्पर्धा
श्रुती सोनावणे व सागर वाघमारे उपांत्य फेरीत दाखल!
मुंबई : मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन, बोरिवली आयोजित आणि रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या
सहकार्याने सुरु असलेल्या १०व्या एमसीएफ महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
आता रंगतदार टप्प्यात पोहोचली आहे. आजच्या सामन्यांमध्ये पुण्याचा सागर वाघमारे
आणि पालघरची श्रुती सोनावणे यांनी दमदार खेळी करत उपांत्य फेरी गाठली.
पुरुष गटात सागरची वीज वेगाने आगेकूच
पुण्याच्या सागर वाघमारेने उप उपांत्य फेरीत मुंबईच्या नीलांश चिपळूणकरवर २५-५, २५-१ असा एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम
ठेवले. विशेष म्हणजे, नीलांशने
यापूर्वीच्या फेरीत माजी विश्वविजेता प्रशांत मोरेला सरळ दोन सेटमध्ये हरवून
खळबळ उडवली होती. मात्र अनुभवी सागरसमोर नीलांश अपयशी ठरला.
महिला गटात श्रुतीची थरारक विजयी खेळी
पालघरच्या श्रुती सोनावणेनं, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आकांक्षा
कदम (रत्नागिरी) हिचा ५-२५, २०-१५, २४-२३ असा थरारक पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
तिसऱ्या सेटमध्ये दोघींचे गुण २३-२३ वर आल्याने निर्णयासाठी अतिरिक्त
नववा बोर्ड खेळवण्यात आला. नाणेफेकीत डाव जिंकून सुरुवात करत श्रुतीने फक्त
एक गुण मिळवत सामना खिशात घातला. ही आकांक्षासाठी स्पर्धेतील अनपेक्षित
वज्राघात ठरली.
पुरुष एकेरी गट – उप उपांत्य फेरीचे इतर निकाल:
प्रफुल मोरे (मुंबई) प. ओंकार टिळक (मुंबई) — १३-१७, १९-४,
२१-१४
महम्मद घुफ्रान (मुंबई) प. संजय मणियार (मुंबई उपनगर) — २५-१, २५-६
पंकज पवार (ठाणे) प. समीर अन्सारी (ठाणे) — २५-९, २४-८
महिला एकेरी गट – उप उपांत्य फेरीचे इतर निकाल:
अंबिका हरिथ (मुंबई) प. ऐशा साजिद खान (मुंबई) — २५-५, १७-१८,
२५-२२
प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) प. रिंकी कुमारी (मुंबई) — २५-१०, २५-१२
मिताली पाठक (मुंबई) प. समृद्धी घाडीगावकर (ठाणे) — २४-६, ५-२३, २५-०
सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत धावत्या
समालोचनासह सुरु आहे.
Post a Comment
0 Comments