Type Here to Get Search Results !

सुप्रिमो चषकाचा क्रिकेट थरार बुधवारपासून ‘वर्ल्डकप ऑफ टेनिस क्रिकेट’ चे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देशातील अव्वल १६ संघांची सज्जता, विजेत्या संघाला १२ लाख रुपये आणि बाईक्स, मॅन ऑफ द सिरीजला मिळणार कार!

 


सुप्रिमो चषकाचा क्रिकेट थरार बुधवारपासून

वर्ल्डकप ऑफ टेनिस क्रिकेट’ चे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते

 

देशातील अव्वल १६ संघांची सज्जता, विजेत्या संघाला १२ लाख रुपये आणि बाईक्स, मॅन ऑफ द सिरीजला मिळणार कार!

 

मुंबई, ८ एप्रिल (प्रतिनिधी): सांताक्रुझच्या एअर इंडिया ग्राऊंडवर उद्या बुधवारपासून (९ एप्रिल) सुरु होणाऱ्या सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार पाच दिवसांच्या क्रिकेट महोत्सवात रंगणार आहे. टेनिस क्रिकेटमधील वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

 

या ११व्या पर्वातील सुप्रिमो चषकाचे आयोजन शिवसेनेचे नेते आमदार अ‍ॅड. अनिल परब आणि आमदार संजय पोतनिस यांच्या पुढाकाराने झाले आहे. आदित्य ठाकरे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 'सुप्रिमो' या टोपणनावावरूनच या स्पर्धेचे नामकरण करण्यात आले आहे.

 

स्पर्धेची वैशिष्ट्ये:

देशभरातून निवडलेले १६ टॉप संघ

८ षटकांचे सामने, दररोज संध्याकाळी ७ वाजल्यापासून

दररोज रंगतील ३ रोमांचक सामने

 

७० पेक्षा अधिक संघांमधून अंतिम १६ संघांची निवड

कर्नाटक, कोलकाता, दिल्ली, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ अशा राज्यांतील संघ सहभागी

 

श्रीलंकेच्या खेळाडूचा सहभाग हे यंदाचे विशेष आकर्षण

 

बक्षिसांचा पाऊस!

विजेता संघ : ₹१२ लाख + संघातील प्रत्येक खेळाडूला एक बाईक

उपविजेता संघ : ₹१० लाख

मॅन ऑफ द सिरीज : मारुती कार

सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज : प्रत्येकी एक बाईक

सर्व सहभागी खेळाडूंना : सन्मानचिन्ह व किट बॅग

आमदार संजय पोतनिस यांच्या म्हणण्यानुसार, विजयी संघातील प्रत्येक खेळाडू लखपती होणार आहे!

 

थेट प्रक्षेपण:

स्पर्धेचे थेट प्रक्षेपण फेसबुक, यूट्यूब आणि केबल नेटवर्क्सवर पाहता येणार आहे.
गेल्या वर्षी तब्बल २४ लाख प्रेक्षकांनी ऑनलाईन थरार अनुभवला, यंदा हा आकडा पार करण्याची शक्यता आहे.


एअर इंडिया मैदानावरील गॅलरीत १५,००० प्रेक्षकांची व्यवस्था असून ‘हाऊसफुल’ गर्दीची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.


Post a Comment

0 Comments