Type Here to Get Search Results !

७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५ : महाराष्ट्राला कबड्डीत रौप्य पदक बलाढ्य हरियाणाच्या विजयात महाराष्ट्राची चिवट झुंज अपुरी पडली; ३९-२८ ने अंतिम फेरीत पराभव


 

७ वी  खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५ : महाराष्ट्राला कबड्डीत रौप्य पदक
बलाढ्य हरियाणाच्या विजयात महाराष्ट्राची चिवट झुंज अपुरी पडली; ३९-२८ ने अंतिम फेरीत पराभव

 

राजबीर, बिहारखेलो इंडिया युवा स्पर्धेच्या सातव्या पर्वात कबड्डीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बलाढ्य हरियाणा संघाने ३९-२८ अशा फरकाने बाजी मारत सुवर्ण पदक पटकावले आणि आपली वर्चस्वशाही पुन्हा सिद्ध केली.

 

राजबीर क्रीडा संकुलात रंगलेल्या या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या सत्रात आक्रमक खेळ करत १७-२२ अशी गुणांची आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात हरियाणाच्या चढाया आणि भक्कम बचावापुढे महाराष्ट्राच्या खेळात सुसूत्रता राहिली नाही. लोणमुळे गुणातील फरक वाढत गेला आणि संघाचे मनोबल खचले.

 


गतवर्षी कांस्यपदक जिंकलेल्या महाराष्ट्राने यंदा थोडी उंच झेप घेतली असली तरी अंतिम लढतीत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यात अपयश आले.

 


स्पर्धेतील हे रौप्य पदक महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब असून पुढील वर्षी सुवर्ण पदकाच्या दिशेने तयारी करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

Post a Comment

0 Comments