एलआयसी - श्रीकांत चषक
कॅरम स्पर्धा : प्रसाद मानेचा अंतिम विजयी ‘स्ट्राईक’!
डोंबिवलीच्या पाटकर विद्यालयाच्या खेळाडूने अव्वल मानांकितला
दिला पराभवाचा धक्का, चुरशीच्या
लढतींनी स्पर्धेचा समारोप
मुंबई : कॅरमच्या पटावर निर्धार, अचूक नेम आणि शेवटच्या
क्षणापर्यंत टिकलेली रोमहर्षक चुरस – अशा वातावरणात डोंबिवलीच्या आयईएस चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या प्रसाद माने याने ‘श्रीकांत चषक राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धे’चे अजिंक्यपद पटकावले.
श्रीकांत स्पोर्ट्स क्लब व सार्वजनिक गणेशोत्सव-कांदिवलीतर्फे आयोजित, एलआयसी प्रायोजित या स्पर्धेत प्रसादने अंतिम सामन्यात पोद्दार अकॅडमी-मालाडच्या प्रसन्न गोळे याला १७-१६ अशा थरारक फरकाने पराभूत केले. विजयानंतर प्रसादने रोख ₹२,००० व चषक आपल्या नावे केला, तर प्रसन्न गोळेला उपविजेतेपद व ₹१,००० पुरस्कारावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील
तब्बल ६४ खेळाडूंनी सहभाग घेतला
होता. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेत उपांत्य
सामन्यांमध्येही प्रेक्षकांना तुफान करमणूक झाली.
प्रसादचा उपांत्य विजय : पार्ले टिळक
विद्यालयाच्या अमेय जंगमविरुद्ध प्रसादने ९-० अशी पिछाडी भरून काढत १४-१४ अशी
बरोबरी साधली. निर्णायक सहाव्या बोर्डमध्ये ब्रेकचा फायदा घेत प्रसादने २१-१४ असा
दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.
प्रसन्नची सहज वाटचाल : दुसऱ्या
उपांत्य फेरीत प्रसन्न गोळेने युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरच्या वेदांत राणेचा २१-९
असा धुव्वा उडवत अंतिम सामन्याची नोंद केली.
स्पर्धेतील उपांत्य उपविजेते अमेय जंगम व वेदांत राणे ठरले, तर उपांत्यपूर्व उपविजेते नील
म्हात्रे, ओमकार देसाई, पुष्कर गोळे व
तीर्थ ठक्कर यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत मंच गाजवला.
स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव एलआयसीचे मार्केटिंग हेड
संतोष आचरेकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण, तसेच श्रीकांत स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात
आला. सर्व खेळाडूंना एलआयसी प्रायोजित कॅरम
स्ट्रायकर भेटवस्तू देण्यात आल्या.
माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, अध्यक्ष तेजस शाह, सचिव प्रणव निकुंभ, पंचप्रमुख अविनाश महाडिक यांनीही
विजेत्यांचे अभिनंदन केले. प्रसाद मानेच्या अचूक
खेळाने ‘श्रीकांत चषक’चा गौरवशाली पट आता डोंबिवलीच्या पाटकर विद्यालयाच्या नावावर
नोंदवला गेला आहे.
Post a Comment
0 Comments