Type Here to Get Search Results !

आरडीज् ब्लास्टर्सचा २६ धावांनी धडाकेबाज विजय; कर्णधार उत्कर्ष राऊतची सर्वांगसुंदर अष्टपैलू कामगिरी सूर्यवंशी क्षत्रिय टी-20 लीगमध्ये उत्कर्षचे ६४ धावा आणि २ विकेट; दुसऱ्या सामन्यात सिम्बा सिक्सर्सचा २ विकेटने विजय

 


आरडीज् ब्लास्टर्सचा २६ धावांनी धडाकेबाज विजय; कर्णधार उत्कर्ष राऊतची सर्वांगसुंदर अष्टपैलू कामगिरी

सूर्यवंशी क्षत्रिय टी-20 लीगमध्ये उत्कर्षचे ६४ धावा आणि २ विकेट; दुसऱ्या सामन्यात सिम्बा सिक्सर्सचा २ विकेटने विजय

 

मुंबई, २१ नोव्हेंबर : सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, मुंबई आयोजित पहिल्या सूर्यवंशी क्षत्रिय टी- ट्वेंटी क्रिकेट लीग २०२५मध्ये कर्णधार उत्कर्ष राऊतच्या भेदक सर्वांगसुंदर कामगिरीच्या जोरावर आरडीज् ब्लास्टर्सने प्राईड ऑफ पालघर (पालघर इलेव्हन सीसी)चा २६ धावांनी पराभव करत दमदार विजय मिळवला.

 

मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर प्रथम फलंदाजी करताना आरडीज् ब्लास्टर्सने २० षटकांत ५ बाद १७० धावांचे मजबूत आव्हान उभे केले. कर्णधार उत्कर्ष राऊतने ३० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ६४ धावांची तडाखेबाज खेळी करून संघाचा डाव भक्कम केला.

 

उत्तरादाखल, पालघर संघाला २० षटकांत ८ बाद १४४ धावाच करता आल्या. चंदन दळवीने ४४ धावांची झुंज दिली. मात्र, उत्कर्ष राऊत, प्रज्वल पवार आणि समीर पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेत पालघरच्या डावाला आवर घातला. अष्टपैलू कामगिरीबद्दल उत्कर्ष राऊतला सामनावीर पुरस्कार मिळाला.

 

दुसरा सामना : सिम्बा सिक्सर्सचा २ विकेट राखून विजय

दैनंदिन रोमहर्षक सामन्यात सिम्बा सिक्सर्सने स्वराज इलेवनवर २ विकेट राखून विजय मिळवला. गोलंदाजांनी गाजवलेल्या या सामन्यात स्वराजचा डाव १७.५ षटकांत १०१ धावांत संपुष्टात आला. कर्णधार विक्रांत ठाकूर (३ विकेट), तसेच हितेश पाटील, पारस पवार आणि ऋषिकेश पाटील (प्रत्येकी २ विकेट) यांनी स्वराजचा नाका नऊ केला.

 

माफक आव्हानाचा पाठलाग करताना सिम्बा सिक्सर्सची सुरुवात ढासळली, परंतु तळातील फलंदाजांनी संयमी खेळ करत १६.४ षटकांत ८ बाद १०२ धावा करून विजय साकारला. सलामीवीर सौरभ ठाकूरने २७ धावा करत सर्वाधिक योगदान दिले. स्वराज इलेव्हनकडून हर्षल पाटीलने ५ विकेट घेत झंझावाती गोलंदाजी केली.

 

संक्षिप्त धावफलक :

आरडीज् ब्लास्टर्स – २० षटकांत ५ बाद १७०, (उत्कर्ष राऊत ६४(३०), हर्षद देसले २/१९) विरुध्द प्राइड ऑफ पालघर – २० षटकांत ८ बाद १४४, (चंदन दळवी ४४; उत्कर्ष राऊत २/२५, प्रज्वल पवार २/१५, समीर पाटील २/१८).

निकाल : आरडीज् ब्लास्टर्स २६ धावांनी विजयी

 

स्वराज इलेवन – १७.५ षटकांत १०१, (तेजस राऊत २२; विक्रांत ठाकूर ३/१२, हितेश पाटील २/१७, पारस पवार ३/१४, ऋषिकेश पाटील २/२६) विरुध्द सिम्बा सिक्सर्स – १६.४ षटकांत ८ बाद १०२, (सौरभ ठाकूर २७; हर्षल पाटील ५/१८)

निकाल : सिम्बा सिक्सर्स २ विकेट राखून विजयी


Post a Comment

0 Comments