समिक्षाचे सोनेरी यश…!
अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग किकबॉक्सिंग स्पर्धेत डीएवी
न्यू पनवेलच्या समिक्षा कायंदेकरचे सुवर्णपदक
ठाणे : चांगू काना ठाकूर कनिष्ठ महाविद्यालय,
पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या अस्मिता खेलो इंडिया
वुमन्स लीग किकबॉक्सिंग स्पर्धेत डीएवी न्यू पनवेल शाळेच्या क्रीडा शिक्षिका
समिक्षा दीपक कायंदेकर
हिने शानदार कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली. १९ वर्षांवरील ५० किलो वजनी गटातील पॉइंट प्रकारात
तिने सर्व प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अव्वल क्रमांक पटकावला.
पनवेल शहर किकबॉक्सिंग संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष निलेश
भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल,
रायगड, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पालघर, पिंपरी चिंचवड आणि पुणे या जिल्ह्यांतून तब्बल
३४२ खेळाडूंनी सहभाग
घेतल्याने स्पर्धा अत्यंत रंगतदार झाली.
स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते व
पनवेल शहर किकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष परेश शेठ ठाकूर,
वाको महाराष्ट्र किकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष निलेश शेलार
आणि पनवेल शहर किकबॉक्सिंग संघटनेचे सचिव डॉ. मंदार पनवेलकर यांच्या हस्ते झाले.
या वेळी नगरसेवक समीर ठाकूर, ऍड. मनोज भुजबळ, दिलीप पाटील, नगराध्यक्ष संदीप पाटील, मयुरेश नेटकर आणि दशरथ म्हात्रे उपस्थित होते.
स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या समिक्षाचा विशेष सत्कार डॉ. मंदार पनवेलकर, सौ. स्मिता पनवेलकर, कार्याध्यक्ष निलेश भोसले, पियुष सदावर्ते आणि प्रतीक कारंडे यांच्या हस्ते करण्यात
आला.
समिक्षाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पनवेल आणि डीएवी न्यू
पनवेल शाळेचा मान अधिक उंचावला आहे.

Post a Comment
0 Comments