शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा येथे संजय बाबूराव शेटे यांचा भव्य
सत्कार सोहळा
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे नवे महासचिव म्हणून शेटे
सरांचा गौरव; मान्यवरांच्या
उपस्थितीत क्रीडा सेवेच्या योगदानाला मोठी दाद
मुंबई : बॉम्बे फिजिकल कल्चर असोसिएशन (बीपीसीए) आणि कॉलेज
ऑफ फिजिकल एज्युकेशनचे अध्यक्ष माननीय श्री संजय बाबूराव शेटे यांची
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या ताज्या निवडणुकीत महासचिव म्हणून निवड
झाल्याबद्दलचा भव्य सत्कार सोहळा १९ नोव्हेंबर २०२५ रोजी शारीरिक शिक्षण
महाविद्यालय, वडाळा येथे उत्साहात
पार पडला. क्रीडा क्षेत्र, संघटनात्मक काम आणि खेळाडू
घडविण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रातील
मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या पुष्पगुच्छ स्वागताने
झाली. शेटे सरांच्या नावीन्यपूर्ण कार्यपद्धती, संघटन कौशल्य, पारदर्शक नेतृत्व आणि खेळाडू व क्रीडा
संघटनांना दिलेल्या मजबूत पाठिंब्याची उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने प्रशंसा केली.
त्यांच्या नेतृत्वामुळे आगामी काळात राज्यातील खेळाडूंसाठी नवीन संधी उपलब्ध होतील,
असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
चंद्रकांत पाटील खजिनदार – मुंबई शहर योगासन असो.), महेश कुंभार (कार्यवाह – मुंबई शहर योगासन
असो.), फैयाज जमादार (कार्यवाह – मुंबई उपनगर योगासन असो.),
शारिरीक शिक्षण संस्थचे प्राध्यापक ,आणि रायगड
जिल्हा योग एसोसिएशनचे सचिव श्री उत्तम मांढरे, प्राजक्ता
खवळे (राष्ट्रीय योग पंच ), श्रद्धा जाधव (योग पंच), प्रमिला नागरे, समृद्धी पाटील, कविता सावंत असे योग पंच व योग
शिक्षक विविध क्रीडा अधिकारी, उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी शेटे सरांच्या निवडीचे स्वागत करत, ते नेहमीच शिस्तप्रिय, क्रीडाप्रेमी आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार
काढले. त्यांच्या नेतृत्वामुळे मुंबईतील क्रीडा आणि योगासन क्षेत्राला नवी दिशा
मिळेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
शेटे सरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व
मान्यवरांनी एकत्र येत स्मरणीय छायाचित्रे काढली आणि सौहार्दपूर्ण वातावरणात
सोहळ्याची सांगता झाली.
या भव्य सत्कार सोहळ्याद्वारे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा यांनी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट
कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची आपली परंपरा पुढे चालवली. सर्व
मान्यवरांनी शेटे सरांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments