Type Here to Get Search Results !

आर.डी. ब्लास्टर्स सीसीचे दमदार सातत्य सूर्यवंशी क्षत्रिय टी-20 क्रिकेट लीगमध्ये ९ विकेट्सने दणदणीत विजय; उत्कर्ष राऊतची झंझावाती नाबाद खेळी

 


आर.डी. ब्लास्टर्स सीसीचे दमदार सातत्य

सूर्यवंशी क्षत्रिय टी-20 क्रिकेट लीगमध्ये ९ विकेट्सने दणदणीत विजय; उत्कर्ष राऊतची झंझावाती नाबाद खेळी

 

मुंबई : सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, मुंबई आयोजित पहिल्या सूर्यवंशी क्षत्रिय टी-20 क्रिकेट लीगमध्ये आर.डी. ब्लास्टर्स सीसीने सूर्यवंशी वॉरियर्स सीसीवर ९ विकेट राखून दणदणीत विजय मिळवत सातत्यपूर्ण कामगिरीची छाप पाडली. मुंबई पोलीस जिमखाना येथे हा सामना रंगला.

 

सूर्यवंशी वॉरियर्स सीसीकडून दिलेले ११८ धावांचे आव्हान आर.डी. ब्लास्टर्स सीसीने केवळ १४ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पार केले. कर्णधार उत्कर्ष राऊतने तिसऱ्या क्रमांकावर येत ३१ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांसह केलेली ६७ धावांची नाबाद परफॉर्मन्स ही विजयाची खऱ्या अर्थाने शान ठरली. त्याला भाविक राऊतने (नाबाद ४४) उत्तम साथ दिली.

 

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सूर्यवंशी वॉरियर्स सीसीने २० षटकांत ९ बाद ११७ धावा केल्या. श्रेयस पाटीलने ३२ धावांचे योगदान दिले. आर.डी. ब्लास्टर्सकडून समीर पाटीलने ३/१४ अशी प्रभावी गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरले. उत्कर्ष राऊतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

अन्य लढतीत, इंस्पायर्ड रॉयल्सने प्राइड ऑफ पालघर इलेव्हन सीसीवर ५ विकेट राखून विजय मिळवला. पंकज पाटीलने १५ धावांत ४ विकेट घेत उल्लेखनीय कामगिरी केली आणि तो सामनावीर ठरला.

 

संक्षिप्त धावफलक :

प्राइड ऑफ पालघर इलेव्हन सीसी – 19.3 ष. सर्वबाद 111 (भाविक पाटील 23; पंकज पाटील 4/15, प्रितेश ठाकूर 2/11). विरुध्द इंस्पायर्ड रॉयल्स – 19.1 ष. 5 बाद 112 (ध्रुव राऊत 31, केदार राऊत 27, नील दादरकर 21*).

निकाल : इंस्पायर्ड रॉयल्स ५ विकेटने विजयी.

सामनावीर : पंकज पाटील.

 

सूर्यवंशी वॉरियर्स सीसी – २० ष. ९ बाद ११७ (श्रेयस पाटील ३२, आयुष एम. २२*, अभिजित पाटील २०; समीर पाटील ३/१४). विरुध्द आर.डी. ब्लास्टर्स सीसी – १४ ष. १ बाद १२१ (उत्कर्ष राऊत ६७* (३१ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार), भाविक राऊत ४४*).

निकाल : आर.डी. ब्लास्टर्स ९ विकेटने विजयी.

सामनावीर : उत्कर्ष राऊत (आर.डी. ब्लास्टर्स सीसी).


Post a Comment

0 Comments