Type Here to Get Search Results !

स्पायडर क्रिकेट अकादमीचा दमदार विजय; रोहितच्या नाबाद अर्धशतकाने चमक एमसीसी टॅलेंट सर्च U-14 क्रिकेट लीगमध्ये ठाण्यावर ६ गडी राखून मात; रोहित एस. सामनावीर





स्पायडर क्रिकेट अकादमीचा दमदार विजय; रोहितच्या नाबाद अर्धशतकाने चमक

एमसीसी टॅलेंट सर्च U-14 क्रिकेट लीगमध्ये ठाण्यावर ६ गडी राखून मात; रोहित एस. सामनावीर

 

मुंबई : ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी टॅलेंट सर्च (१४ वर्षांखालील मुलांची) क्रिकेट लीगमध्ये स्पायडर क्रिकेट अकादमीने जबरदस्त खेळी साकारत एमसीसी ठाणे संघावर ६ विकेट राखून सहज विजय मिळवला.

ओव्हल मैदानावर झालेल्या या दुसऱ्या फेरीतील साखळी सामन्यात ठाण्याने दिलेले १७० धावांचे आव्हान स्पायडर क्रिकेट अकादमीने ३३.१ षटकांत फक्त ४ गडी गमावून पूर्ण केले.


संघाचा फलंदाज रोहित एस. याने ७६ धावांची तडाखेबाज नाबाद खेळी करत विजयाचा पाया रचला. त्याला आकाश मोरया (३७ धावा) याने उत्तम साथ दिली.

 

यापूर्वी, एमसीसी ठाणे संघाने ४० षटकांत ९ बाद १६७ धावा केल्या. त्यात अध्यायन पारिख (३०) आणि विराट सिंग (२६) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्पायडर क्रिकेट अकादमीकडून स्पर्श पाटील (३/२९) आणि सागर शर्मा (२/२५) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

 

संक्षिप्त धावफलक :
एमसीसी ठाणे – ४० षटकांत ९ बाद १६७ (अध्यायन पारिख ३०, विराट सिंग २६; स्पर्श पाटील ३/२९, सागर शर्मा २/२५) विरुध्द स्पायडर क्रिकेट अकादमी – ३३.१ षटकांत ४ बाद १६९ (रोहित एस. ७६*, आकाश मोरया ३७; नित्या पटेल ३/१४)


निकाल : स्पायडर क्रिकेट अकादमी ६ विकेट राखून विजयी


सामनावीर : रोहित एस. (स्पायडर सीए)

 

छायाचित्र : रोहित एस. स्पायडर क्रिकेट अकादमीचा धडाकेबाज फलंदाज रोहित एस. याला सामनावीर पुरस्कार प्रदान करताना.


Post a Comment

0 Comments