Type Here to Get Search Results !

५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा कुमार गटात धाराशिव वि. पुणे व सोलापूर वि. सांगली तर मुली गटात धाराशिव वि. ठाणे व सोलापूर वि. सांगली उपांत्य फेरीत भिडणार


 

५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

 

कुमार गटात धाराशिव वि. पुणेसोलापूर वि. सांगली तर

मुली गटात धाराशिव वि. ठाणेसोलापूर वि. सांगली उपांत्य फेरीत भिडणार

 

अहिल्यानगर (क्री. प्र.) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यांचा थरार शिगेला पोहोचला आहे. कुमार गटात धाराशिव, पुणे, सांगली व सोलापूर संघानी तर मुलींच्या गटात धाराशिव, ठाणे, सोलापूर आणि सांगली या संघानी उपांत्य फेरी गाठत आपले वर्चस्व सिद्ध केले. सर्व सामने उच्च दर्जाची झुंज, रणनीती व जिद्दीचा उत्तम मिलाफ घडवणारे ठरले. येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत वेग, चातुर्य आणि मनोबळाची खरी परिक्षा पाहायला मिळाली.

 


उपउपांत्य फेरीच्या मुलांच्या पहिल्या सामन्यात धाराशिवने मुंबईवर १ डाव ३३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. मध्यंतरासच धाराशिवकडे ५ ड्रिम रनसह ४२-६ अशी मोठी आघाडी होती. धाराशिवकडून जितेंद्र वसावे (३.४० मि. संरक्षण व ६ गुण), विशाल वसावे (३.०० मि. संरक्षण व ४ गुण) राज जाधव (२.२० मि. संरक्षण व तब्बल १६ गुण) यांनी तर पराभूत मुंबईच्या प्रसाद घाडीगांवकर (४ गुण) सामन्यात एकार्फी कामगिरीची नोंद केली.

 


दुसऱ्या सामन्यात सोलापूरच्या धारदार आक्रमणामुळे ठाण्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. सोलापूरने ४ गुणांनी निसटता विजय मिळविला. सोलापूरकडून शंभुराजे चंदनशिवने १.४० मि. संरक्षण करून आक्रमणात १० गुण मिळवले. सुहान आत्तारने २.१० मि; सिद्धार्थ मानेने १.५० मि. तर अकबर शेखने २.३० मि. संरक्षण केले. ठाण्याच्या आशिष गौतमने दोन्ही डावात प्रत्येकी २ मि. संरक्षण करून आक्रमणात ८ गुण संपादन करून एक हाती लढत दिली. ओंकार सावंतने १ , १.१० मि. संरक्षण करून आक्रमणात ६ गुण मिळवले.

 


तिसऱ्या सामन्यात  मध्यंतरातच २५-१२ अशी आघाडी घेणाऱ्या पुणे संघाने मुंबई उपनगर संघावर २६-२४ असा १ डाव २ गुणांनी मात केली. पुणे संघाकडून शंकर यादव १.४० व १.३० मि. संरक्षण आक्रमणात ८ गुण, श्री वसावेने १.२० व १.४० मि. संरक्षण केले. आदेश पाटीलने १.३० व १.५० मि. संरक्षण करताना आक्रमणात ४ गुण मिळवले. उपनगर संघाकडून अर्जुन सर्जेरावने १.०० मि. संरक्षण करीत आक्रमणात ४ गुण मिळवले.

 

चौथ्या सामन्यात सांगलीने  सातारा संघाला ५०-२४ असे २६ गुणांनी पराभूत केले. विजयी संघाकडून अथर्व पाटीलने १.३० मि. पळतीचा खेळ करत गुण मिळवले. गणेश परेकरने १.४०,मि. पळतीचा खेळ करत गुण मिळवले. पार्थ देवकातेने १.३०, १.२० मि. पळतीचा खेळ करत १० गुण मिळवले. तसेच सातारा संघाकडून प्रेम लोखंडेने मि. खेळ करत गुण तर लोकेश जाधवने १.४० मि खेळ करत गुण आणि तबरेज खानने १.४० मि. खेळ करत गुण मिळवले.

---------

 

मुलींच्या उपांत्यपूर्व सामन्यात सोलापूरने साताऱ्यावर २९-२२ असा ५.२० मि.  राखून गुणांनी विजय मिळविला. सोलापूरकडून खेळताना स्नेहा लामकाने ५.१० व १२ गुण, अश्विनी मांडवेने १.३५ मि. संरक्षण व ४ गुण तसेच कल्याणी लामकाने हिने १.५०, १.४५ मि. संरक्षण २ गुण मिळवले. साताऱ्या कडून संचिता गायकवाडने  १.३०, १.४० मि. संरक्षण व ८ गुण मिळवले.

 

धाराशिव विरुद्ध रत्नागिरी या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात धाराशिव संघाने ३२-२७ असा ५ गुणांनी विजय संपादन केला. धाराशिव संघाकडून मैथिली पवारने ३.५०, ३.४९ मि. संरक्षण करत आक्रमणात १६ गुण मिळवले. सिद्धी भोसलेने १.१० मि. संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले. राही पाटीलने १.४० मि. २.२० मि. संरक्षण करून दोन गुण संपादन केले. रत्नागिरीतर्फे सायली कर्लेकरने १.४०, १.२० मि. संरक्षण  करत गुण, साक्षी लिंगायत १.४० संरक्षण करत गुण, श्रावणी सनगरेने १.१० मि., दिव्या सनगले मि. खेळ केला. आक्रमणात वैष्णवी फुटकने १० गुण, दिव्या पाल्येने गुण तर तन्वी खानविलकरने गुण मिळवले.

 

ठाणे विरुद्ध नाशिक या तिसऱ्या सामन्यात  ठाणे संघाने १३ गुण आणि ४.३० मिनिटं राखून विजय मिळविला. ठाणे संघाकडून धनश्री कंकने ३.१० मिनिटे संरक्षण केले. श्रुती चोरमारेने २.५५ मि. संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले. दीक्षा काटेकरने १.३० मि. संरक्षण करून सहा गुणांची कमाई केली. प्रणिती जगदाळेने २.१०, नाबाद २.३० मि. संरक्षण करून आक्रमणात दोन गुण मिळवले. नाशिक संघाकडून नीलम महाडकरने २.३०, १.१५ मि.  संरक्षण करून आक्रमणात दोन गुण मिळवले.

 

चौथ्या सामन्यात सांगलीने पुण्याला १५-२९ असे १४ गुणांनी नमविले. सांगली कडून  श्रावणी तामखडे हिने ३.३० मि. संरक्षण केले. धनश्री तामाखडेने २.५० मि. संरक्षण व आक्रमणात गुण, चाफे सानिका २.५० मि. संरक्षण व आक्रमणात गुण तर कृत्तिका अहिरने ३.४० मि. संरक्षण व आक्रमणात २ गुण मिळवले. पुण्याकडून अपर्णा वर्धेने २.२० मि. संरक्षण, धनश्री लव्हाळने १.५० मि.संरक्षण व ४ गुण मिळवले.

 

---------

असे होणार उपांत्य सामने

कुमार गट : धाराशिव विरुद्ध पुणे,  सोलापूर विरुद्ध सांगली.

मुली गट : धाराशिव विरुद्ध ठाणे, सोलापूर विरुद्ध सांगली.

-------

Post a Comment

0 Comments