दिल्लीच्या रिंगमध्ये पनवेलचा दमदार ठसा!
वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग २०२६ मध्ये ४ सुवर्ण,
४ रौप्य,
५ कांस्य;
एकूण १३ पदकांची
झंझावाती कमाई
रिंगमध्ये घणाघाती कामगिरी,
पनवेलचा जल्लोष
ठाणे : नवी
दिल्लीतील के.डी. जाधव इनडोअर, इंदिरा गांधी स्टेडियममध्ये घणाघाती फटके आणि अचूक
तंत्रांनी रिंग दणाणली आणि पनवेलच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाचा
झेंडा फडकावला! वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग २०२६ स्पर्धेत पनवेलकरांनी तब्बल ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य अशी एकूण १३ पदके पटकावत शानदार कामगिरीची नोंद केली.
२५ देशांचा सहभाग, महाराष्ट्रातून ९१ खेळाडू
वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन,
स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया
आणि जेके टायर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत
२५ देशांतील
खेळाडूंनी सहभाग घेतला. पॅलेस्टाईन, उझबेकिस्तान, इराक, इटली, कझाकिस्तान, स्वित्झर्लंड, नेपाळ, युरोप आदी देशांतील खेळाडूंसह भारताचा दमदार सहभाग होता.
महाराष्ट्रातून ९१ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला, त्यापैकी पनवेल शहरातील १० खेळाडूंची भारतीय संघात निवड
झाली होती.
सुवर्णझळाळी : अर्णवची दुहेरी कामगिरी
पनवेलच्या पदकयात्रेचा शिल्पकार ठरला अर्णव इंगोले, ज्याने २ सुवर्ण पदके जिंकत आपली ताकद सिद्ध केली. त्याचबरोबर
अन्वी निकम
आणि काव्य सेजल यांनी प्रत्येकी १ सुवर्ण पदक मिळवत सुवर्णझळाळी वाढवली.
रौप्याची दमदार कमाई
रिंगमध्ये अचूक तंत्र आणि जिद्दीच्या जोरावर
रोनल पाटील
याने २ रौप्य पदके पटकावली. तसेच शुभम पवार आणि सानिया शेख यांनी प्रत्येकी १ रौप्य पदक जिंकत पनवेलच्या यशात मोलाची भर घातली.
कांस्य पदकांची भर
कठीण लढतींतून मार्ग काढत श्रेया कुडलकर हिने २ कांस्य पदके जिंकली. तसेच प्रणव लब्दे, शुभम पवार आणि आर्यन शिवतरकर यांनी प्रत्येकी १ कांस्य पदक मिळवत पदकतालिकेत आपले नाव कोरले.
प्रशिक्षकांचे मार्गदर्शन ठरले निर्णायक
या सर्व पदकविजेत्या खेळाडूंना पनवेल शहर किकबॉक्सिंगचे अध्यक्ष परेश ठाकूर,
सचिव मंदार पनवेलकर,
कार्याध्यक्ष व सीनियर प्रशिक्षक
निलेश भोसले, तसेच प्रशिक्षक योगेश बैकर आणि रोहित थळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध
प्रशिक्षणामुळेच पनवेलकरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचा ठसा उमटवला.
पनवेलची आंतरराष्ट्रीय झेप
१३ पदकांची ही कमाई केवळ आकड्यांची नाही,
तर पनवेलच्या खेळाडूंच्या मेहनती,
शिस्त आणि जिद्दीची साक्ष आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत
मिळवलेले हे यश राज्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

Post a Comment
0 Comments