दादरमध्ये आजपासून को-ऑपरेटिव्ह बँक युनियनची टेनिस क्रिकेट
स्पर्धा रंगणार
राज्यातील ३२ बँक संघ अजिंक्यपदासाठी सज्ज
पुरंदरे स्टेडियमवर होणार क्रिकेटचा जल्लोष
मुंबई : दादरच्या पुरंदरे स्टेडियमवर आजपासून क्रिकेटचा थरार उसळणार
आहे! चौकार-षटकारांचा वर्षाव, चुरशीच्या लढती आणि सहकारी बँक कर्मचाऱ्यांचा उत्साह यामुळे
वातावरण भारावून जाणार आहे. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ
यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन,
मुंबई
आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट स्पर्धेत राज्यातील ३२
सहकारी बँकांचे संघ अजिंक्यपदासाठी आमनेसामने येणार आहेत.
भव्य उद्घाटन सोहळा
या बहुप्रतीक्षित स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता
दादर-पूर्व येथील पुरंदरे स्टेडियमवर होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ तसेच सल्लागार व माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
राज्यभरातील संघांची सज्जता
मुंबई शहर व उपनगरसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील बँकांचे संघ पूर्ण तयारीनिशी
मैदानात उतरणार आहेत. विजेतेपदासाठी मुंबई बँक, सांगली सहकारी बँक, रत्नागिरी बँक, मोगविरा बँक, ठाणे भारत सहकारी बँक, अपना बँक, मंत्रालय बँक, मालाड बँक, डेक्कन बँक, कोकण मर्कन्टाईल बँक, जीएस महानगर बँक, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक,
एस.टी. बँक,
झोराष्ट्रीयन बँक,
विमा कामगार बँक,
वैश्य बँक,
जनकल्याण बँक,
ग्रेटर बॉम्बे को-ऑप.
बँक, हिंदुस्थान
बँक, नेव्हल
डॉकयार्ड बँक, दमक जावळी बँक, अरिहंत बँक, एनकेजीएसबी बँक, मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग को-ऑप. बँक
यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.
बाद पद्धतीतील थरार आणि आकर्षक बक्षिसे
ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार असून पहिल्या ४ विजेत्या-उपविजेत्या संघांना रोख पारितोषिकासह आकर्षक चषक
प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशा वैयक्तिक पुरस्कारांनीही खेळाडूंना सन्मानित केले जाणार
आहे.
युनियन पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
उद्घाटनप्रसंगी कार्याध्यक्ष सुनील साळवी,
सरचिटणीस नरेंद्र
सावंत, खजिनदार
प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर, नितीन गवादे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी
सहकारी बँक कर्मचाऱ्यांमधील एकात्मता,
संघभावना आणि क्रीडाप्रेम यांचे सुंदर दर्शन घडविणारी ही
स्पर्धा दादर परिसरात उत्साहाचे नवे पर्व सुरू करणार आहे. आता सर्वांच्या नजरा
लागल्या आहेत त्या अजिंक्यपदाच्या चषकावर कोण उंचावणार हा मानाचा तुरा, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!

Post a Comment
0 Comments