कै. अजितदादा पवार क्रीडा नगरीत पश्चिम रेल्वेचा ‘डायनॅमिक’
डबल धमाका!
कै. उमेश शेणॉय स्मृती चषक व्यावसायिक खो-खो स्पर्धेत पुरुष
व महिला गटात पश्चिम रेल्वेला दुहेरी मुकुट
महाराष्ट्र पोष्ट व मुंबई पोलिस उपविजेते
मुंबई : दादरच्या कै. अजितदादा पवार क्रीडा नगरीत जल्लोषाचा
जणू स्फोटच झाला! मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने अमर हिंद मंडळ आयोजित कै.
उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेत कै.
उमेश शेणॉय स्मृती चषकावर पश्चिम रेल्वेने असा झंझावाती ताबा मिळवला की प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत विजयाचा
जल्लोष आकाशाला भिडवला. पुरुष आणि महिला दोन्ही गटांत दुहेरी मुकुट पटकावत पश्चिम
रेल्वेने स्पर्धेत आपले वर्चस्व ठसठशीतपणे सिद्ध केले. या स्पर्धेत पुरुषांमध्ये महाराष्ट्र
पोष्ट व मुंबई पोलिस यांनी उपविजेतेपद मिळवले. तर पुरुषांमध्ये
बँक ऑफ इंडियाला तृतीय क्रमांकावर तर बृहन्मुंबई महानगरपालिकेला चतुर्थ
क्रमांकावर व महिलांमध्ये महावितरण कंपनीला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे
लागले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे
सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या हस्ते पार पडले.
अंतिम सामन्यात २४-१८ चा विजयी जल्लोष!
पुरुष गटातील अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने
महाराष्ट्र पोष्टवर २४-१८ असा ६ गुणांनी विजय मिळवत थरारक
यश संपादन केले. महाराष्ट्र पोष्टने नाणेफेक जिंकून आक्रमणाची निवड केली;
मात्र पश्चिम रेल्वेच्या शिस्तबद्ध संरक्षणापुढे त्यांचा
डाव कोसळला.
विजयी पश्चिम रेल्वेच्या वृषभ वाघ (२.४५ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ सादर करत
संघाला भक्कम आधार दिला. राहूल मंडल (२ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संरक्षणात भिंत उभी केली,
तर आदित्य गणपुले (१.५० मि. संरक्षण व २ गुण), मजहर जमादार (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), निखील सोडये (नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण),
अमित पाटील
(२.१० मि. संरक्षण) आणि
विजय शिंदे
(१.२० मि. संरक्षण) यांनी
सातत्यपूर्ण कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पराभूत महाराष्ट्र पोष्टच्या अक्षय मासाळ
(१.५० मि. संरक्षण व २ गुण),
लक्ष्मण गवस
(१ मि. संरक्षण व ४ गुण),
प्रतिक देवारे
व सनी तांबे (प्रत्येकी १.३० मि. संरक्षण व २ गुण),
हर्षद हातनकर
(१.२० मि. संरक्षण व २ गुण) आणि
प्रज्ञेश पाटील
(४ गुण) यांनी दिलेली झुंजार लढत कौतुकास्पद ठरली. सामन्यावर
पंच प्रमुख म्हणून देवेंद्र बर्डे यांनी जबाबदारी पार पाडली.
तृतीय क्रमांकासाठी चुरशीची लढत
पुरुषांच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात बँक ऑफ इंडियाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ३०-२८ असा अत्यंत अटीतटीच्या सामन्यात पराभव करत तिसऱ्या
स्थानावर झेप घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीने प्रेक्षकांची
उत्कंठा शिगेला पोहोचवली होती.
वैयक्तिक पुरस्कारांचा मानकरी ठरलेले तारे
पुरुष गट
- उत्कृष्ट
संरक्षण : राहूल मंडल (पश्चिम रेल्वे)
- उत्कृष्ट
आक्रमक : लक्ष्मण गवस (महाराष्ट्र पोष्ट)
- अष्टपैलू
खेळाडू : वृषभ वाघ (पश्चिम रेल्वे)
महिला गट
- उत्कृष्ट
संरक्षण : पायल पवार (Mumbai Police)
- उत्कृष्ट
आक्रमक : कल्याणी कंक
(पश्चिम रेल्वे)
- अष्टपैलू
खेळाडू : अर्चना माजी (पश्चिम रेल्वे)
महिला गटातही पश्चिम रेल्वेने सरस खेळ सादर करत दुहेरी
मुकुट पूर्ण केला, तर मुंबई पोलिसने उपविजेतेपद मिळवत सन्मान राखला. महावितरण कंपनीला तृतीय
क्रमांकावर समाधान मानावे लागले.
मान्यवरांच्या हस्ते गौरव सोहळा
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस
प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव
यांच्या हस्ते दिमाखात पार पडला. यावेळी अमरहिंद मंडळाचे
विश्वस्त अरुण देशपांडे, सीमा कोल्हटकर, उत्कर्षा तळेकर, प्रफुल्ल पाटील, विजय राणे, रवींद्र तांबे, अमित किंबहुने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहकार्यवाह
बाळासाहेब (बाळ) तोरसकर,
मुंबई खो-खो संघटनेचे प्र. कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई, निलेश सावंत, रोहन चव्हाण तसेच अनेक पदाधिकारी व खो-खो कार्यकर्ते उपस्थित होते.
पश्चिम रेल्वेचा दबदबा,
स्पर्धेला नवा आयाम

.jpeg)
.jpeg)


Post a Comment
0 Comments