Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र मास्टर्स योगासन स्पर्धेची दिमाखदार रंगत! पालघरच्या प्रशांत कोरे यांना तृतीय क्रमांक मुंबईच्या लतिका जयस्वाल, स्मिता अंकुशराव, पद्मजा नगराज यांचीही चमकदार कामगिरी योगासनांच्या सुरेख सादरीकरणाने स्पर्धा गाजली

 


छत्रपती संभाजीनगरात महाराष्ट्र मास्टर्स योगासन स्पर्धेची दिमाखदार रंगत!

पालघरच्या प्रशांत कोरे यांना तृतीय क्रमांक

मुंबईच्या लतिका जयस्वाल, स्मिता अंकुशराव, पद्मजा नगराज यांचीही चमकदार कामगिरी

योगासनांच्या सुरेख सादरीकरणाने स्पर्धा गाजली

 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक १३ ते १५ मार्च २०२६ दरम्यान पार पडलेल्या ४२ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर्स योगासन स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी आपल्या लवचिकता, संतुलन आणि साधनेची अप्रतिम झलक दाखवत स्पर्धेला अविस्मरणीय रंगत आणली. अनुभवी आणि कसलेल्या खेळाडूंच्या सुरेख योगासन सादरीकरणामुळे प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले. या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कौशल्याची झळाळी दाखवली.

 

प्रशांत कोरे यांची उल्लेखनीय झेप

पालघर जिल्ह्यातील प्रशांत प्रभाकर कोरे यांनी ४५ ते ५५ वर्षे पुरुष गटात उल्लेखनीय खेळ करत तृतीय क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. अनुभवी शैलीत सादर केलेल्या त्यांच्या संतुलित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रभावी योगासनांनी परीक्षकांची दाद मिळवत त्यांना मानाचा क्रमांक मिळवून दिला.

 

महिला गटात मुंबईच्या खेळाडूंचा दमदार ठसा

४५ ते ५५ वर्षे महिला गटात मुंबई उपनगर तर्फे लतिका रविंद्र जयस्वाल यांनी शानदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याच गटात मुंबई शहर तर्फे स्मिता शांताराम अंकुशराव यांनी तृतीय क्रमांक, तर पद्मजा नगराज यांनी चतुर्थ क्रमांक मिळवत मुंबईच्या योगासन परंपरेचा दमदार ठसा उमटवला.

 

५५ ते ६५ वर्षे महिला गटातही उल्लेखनीय कामगिरी

५५ ते ६५ वर्षे महिला गटात मुंबई शहरच्या फाल्गुनी नरेश दोशी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक मिळवला, तर ज्योती विनोद पटोलिया यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला. याच गटात पालघर जिल्ह्यातील निर्मला अगरवाल यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत पाचवा क्रमांक मिळवला.

 

विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव

या स्पर्धेत विजेते ठरलेल्या सर्व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण साधनेमुळे मिळालेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी स्पर्धांमध्येही अशीच दमदार कामगिरी करत राज्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्व विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात येत आहेत.


Post a Comment

0 Comments