पलाशची विजयी घोडदौड संपुष्टात
श्रेयांशचा दमदार डाव
चेस मास्टर्स स्पर्धेत रंगली चुरस
आघाडीवर तिहेरी सामना
मुंबई : अखेर सहाव्या फेरीत जोरदार धक्का बसला आणि सलग विजयांची
मालिका खंडित झाली! पलाश मापारा याची विजयी घोडदौड श्रेयांश सोमय्या याने थांबवत स्पर्धेत मोठा उलटफेर घडवून आणला. या
पराभवामुळे पलाश (५ गुण) अव्वल स्थानावरून घसरला, तर श्रेयांश (५.५ गुण) याने आघाडीवर झेप घेत स्पर्धेत नवा रंग भरला.
टॉप बोर्डवरील निर्णायक लढत:
पेडर रोड येथील मुंबई चेस सेंटरमध्ये टॉप बोर्डवर पांढऱ्या
मोहऱ्यांसह खेळणाऱ्या पलाश मापारा याला श्रेयांश सोमय्या (५.५) याच्या अचूक आणि चाणाक्ष डावपेचांसमोर टिकाव धरता आला नाही
आणि त्याला ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह श्रेयांशने स्पर्धेचे चित्रच पालटून
टाकले.
आघाडीवर तिहेरी संघर्ष: सहाव्या फेरीनंतर श्रेयांश सोमय्या, श्रीराम म्हसणे आणि एजीएम राजवीर नाहर
हे तिघेही ५.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर असून विजेतेपदासाठीची लढत आता अधिकच रंगतदार आणि चुरशीची
बनली आहे.
म्हसणे आणि नाहर यांची प्रभावी कामगिरी:
श्रीराम म्हसणे (५.५)
याने प्रतिक यादनिक (४.५) याच्यावर ०-१ असा विजय मिळवत आघाडीत स्थान मिळवले,
तर एजीएम राजवीर नाहर (५.५) याने यशराज राठी (४.५) याला १-० असे हरवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.
तनुज, अर्जुन, दीपक यांची विजयी झेप: तनुज दयाल (५) याने अमेय दांडेकर (४) याचा ०-१ असा पराभव केला, तर अर्जुन सिंह (५) याने ध्रुव मुठे (४) याच्यावर १-० असा विजय नोंदवला. तसेच दीपक सोनी (५) याने नैतिक माने (४) याला ०-१ असे हरवले.
इतर लढतींमध्येही रंगत: कथित शेलार (५) याने प्रेयस वाघमारे (४) याला १-० असे पराभूत केले, प्रिशा मर्गज (५) हिने एआयएम आकाशकुमार (४) याच्यावर ०-१ अशी मात केली, तर अनिरुद्ध अय्यर (४.५) आणि एएफएम सोहम पवार (४.५) यांच्यातील सामना ०.५-०.५ असा बरोबरीत सुटला. याचबरोबर अरिन भाटवडेकर (५) याने अक्षय छाचड (४) याला १-० असे हरवले.
स्पर्धा उत्कंठावर्धक टप्प्यात:
पलाश मापारा
याचा पराभव आणि आघाडीतील तिहेरी संघर्ष यामुळे स्पर्धा आता
अत्यंत उत्कंठावर्धक टप्प्यात पोहोचली असून पुढील फेऱ्यांमध्ये प्रत्येक डाव
निर्णायक ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments