Type Here to Get Search Results !

खेलो इंडिया अंतर्गत जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न जळगाव संघ विजयी

 


खेलो इंडिया अंतर्गत जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव संघ विजयी

 

जळगाव : भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या मान्यतेने तसेच राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या सहकार्याने ‘खेलो इंडिया’ अंतर्गत महिलांची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा दि. ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी विद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडली. जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग नोंदवला.

 

अंतिम लढतीत जळगावचा दबदबा :

अंतिम सामन्यात जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल संघाने समाजकार्य महाविद्यालय संघावर सरळ दोन सेटमध्ये (२५-२०, २५-१८) विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या सामन्यात जळगाव संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले.

 

तृतीय स्थानासाठी चुरस :

तृतीय क्रमांकाच्या लढतीत धरणगाव तालुका संघाने अंजुमन हायस्कूल, जामनेर संघावर मात करत तिसरे स्थान मिळवले.

 

मान्यवरांच्या हस्ते गौरव :

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, कु. प्रतीक्षा सोनवणे, सौ. जयश्री पाटील, राज्य संघटनेचे सचिव विरल शाह, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रदीप तळवेलकर, डॉ. विजय पाटील, इकबाल मिर्झा, ज्ञानेश्वर बागुल आणि भैया देसले यांनीही उपस्थिती लावली.

 


स्पर्धेचे यशस्वी आयोजन :

स्पर्धेत पंच म्हणून सूरज वराडे, क्षितिज सोनवणे, जयेश मासरे, निखिल पाटील, मच्छिंद्र पारधी, ललित ढोके आणि राहुल वाघ यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भगतसिंग निकम, लोखिक मुंदडा, कोमल तायडे, चिन्मय बाविस्कर, इमरान बिस्मिल्ला, सागर महाजन, दानिश खान तसेच विद्या इंग्लिश मीडियम स्कूलचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, खेळाडू आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

समारोप सोहळा :

बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. देवदत्त पाटील यांनी केले.


Post a Comment

0 Comments