पुण्याचा जल्लोष! राज्य अजिंक्य कॅरम स्पर्धेत
पुरुष गटावर पुण्याची मोहोर
ठाण्याला २-१ ने
पराभूत करत दणदणीत विजय
योगेश परदेशीचा अनुभव निर्णायक
धडाकेबाज अंतिम लढत; पुण्याची सरशी
नवी मुंबई : वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये सुरू असलेल्या
६० व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष सांघिक गटात पुणे संघाने
ठाण्यावर २-१ अशी रोमांचक मात करत विजेतेपद पटकावले. तिन्ही सामन्यांमध्ये रंगलेल्या चुरशीच्या
लढतींनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली.
अनिल मुंढे – रहीम खान जोडीची विजयी सुरुवात
पुण्याच्या अनिल मुंढे व रहीम खान या जोडीने ठाण्याच्या पंकज पवार व समीर अंसारी यांना २५-१३, १६-१३ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत पुण्याला दमदार
आघाडी मिळवून दिली. या विजयाने पुण्याच्या विजेतेपदाच्या वाटचालीला मजबूत पाया
मिळाला.
झैद फारुकीची झुंजार कामगिरी; ठाण्याची बरोबरी
ठाण्याच्या झैद अहमद फारुकी याने पुण्याच्या अभिजित त्रिपनकर विरुद्ध पहिला सेट ९-२५ असा गमावला; मात्र त्यानंतर शानदार पुनरागमन करत २५-१२, २३-१० असे पुढील दोन सेट जिंकून सामना १-१ असा बरोबरीत
आणला.
योगेश परदेशीचा अनुभव ठरला निर्णायक
निर्णायक सामन्यात माजी विश्वविजेता योगेश परदेशी याने आपल्या अनुभवाच्या जोरावर ठाण्याच्या कुणाल राऊत याला ८-२५, २५-८, २५-१२ असे पराभूत करत पुण्याला बहुमोल विजय मिळवून
दिला. या विजयाने पुण्याचा जल्लोष शिगेला पोहोचला.
रत्नागिरीचा तिसऱ्या क्रमांकावर कब्जा
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरी संघाने मुंबईवर २-१ असा विजय मिळवत
तिसरा क्रमांक पटकावला. मुंबईच्या प्रशांत मोरे याने अभिषेक चव्हाण याला २३-८, १५-१५ असे हरवत एकमेव विजय मिळवला. मात्र
रत्नागिरीच्या रियाझ अकबर अली याने विकास धारिया याला ११-२४, २०-११, २५-७ असे नमवले. सेच राहुल भस्मे व योगेश कोंडविलकर या जोडीने
मुंबईच्या गिरीश तांबे व निलांश चिपळूणकर यांना ०-१८, २४-२३, १९-५ असे पराभूत करून विजयावर शिक्कामोर्तब केले.
पुरुष एकेरीत तिसऱ्या फेरीतील सामने
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीतील लढती–
सलमान खान (मुंबई) वि इम्तियाझ हुन्नरे (पुणे), चांद युसूफ शेख (पुणे) वि प्रवीण माढवी
(पुणे), भरत कोळी (मुंबई) वि स्वप्नीलराजे शिंदे (रत्नागिरी),
महम्मद घुफ्रान (मुंबई) वि
राहुल कुटे (मुंबई उपनगर).
वयस्कर एकेरीत पाचव्या फेरीची चुरस : वयस्कर एकेरी गटात पाचव्या फेरीतही झाले उत्कंठावर्धक
सामने
मिलिंद वाडकर (मुंबई उपनगर) वि बाळकृष्ण लोकरे
(पुणे), फय्याझ शेख (पुणे) वि सुधाकर शिर्के (मुंबई), नूर महम्मद शेख (मुंबई) वि पवन मेस्त्री
(मुंबई), गिरीधर भोज (मुंबई उपनगर) वि अनिल बोढारे (पालघर), संजय थिटे (पुणे) वि राजकुमार ठाकूर (पुणे), शब्बीर खान (मुंबई उपनगर) वि अशोक गायकवाड
(ठाणे),
सत्यनारायण दोंतुल्ला
(मुंबई) वि महम्मद जावेद खान (ठाणे).

Post a Comment
0 Comments