राष्ट्रीय
तायक्वाँडो स्पर्धेत समर्थ पाटीलची कांस्य झेप
बेंगळुरूतील केव्हीएस राष्ट्रीय स्पर्धेत -५२ किलो वजनी गटात दमदार कामगिरी
उपांत्य
फेरीत अवघ्या १ गुणाने हुकले अंतिम फेरीचे तिकीट
मुंबई
: राष्ट्रीय स्तरावरील तायक्वाँडोच्या
रिंगमध्ये दमदार लढत देत समर्थ पाटीलने आपल्या जिद्दीची आणि मेहनतीची
पुन्हा एकदा चुणूक दाखवली. केंद्रीय विद्यालय संघटन (KVS)
यांच्या वतीने बेंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वाँडो
स्पर्धेत समर्थने -५२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले. उपांत्य फेरीपर्यंत धडक मारलेल्या समर्थला
दिल्लीच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणापर्यंत झुंज
देऊनही अवघ्या १ गुणाने पराभव स्वीकारावा लागला.
उपांत्य
फेरीत शेवटच्या क्षणापर्यंत झुंज
स्पर्धेच्या
प्रत्येक फेरीत समर्थ पाटीलने आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन
केले. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने उपांत्य फेरी गाठली. दिल्लीच्या
खेळाडूविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची झुंज रंगली.
समर्थने अखेरच्या क्षणापर्यंत सामना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न
केले; मात्र निर्णायक क्षणी फक्त १ गुणाने
सामना हातातून निसटला. त्यामुळे अंतिम फेरीचे तिकीट
हुकले असले तरी कांस्यपदकावर समर्थने आपले नाव कोरले.
५
वर्षांहून अधिक काळ तायक्वाँदोची साधना
समर्थ
पाटील सध्या केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत
असून, गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ तो
तायक्वाँदोचे नियमित प्रशिक्षण घेत आहे. विविध स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली
कामगिरी करत त्याने राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कठोर सराव,
शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे राष्ट्रीय
कांस्यपदक त्याच्या क्रीडा प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
प्रशिक्षकांच्या
मार्गदर्शनाची मोलाची साथ
समर्थच्या
या यशामागे त्याचे प्रशिक्षक राजेश मुराव, तुषार
पाटील आणि कार्तिक नायडू यांचे मोलाचे
मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणातील बारकावे, तांत्रिक
कौशल्य आणि सामन्यातील योग्य डावपेच यांची प्रभावी सांगड घालत समर्थने राष्ट्रीय
स्पर्धेत आपली छाप पाडली.
आता
मोठ्या यशाची अपेक्षा
राष्ट्रीय
स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या समर्थ पाटीलचे विविध स्तरांतून अभिनंदन होत
आहे. उपांत्य फेरीत अवघ्या १ गुणाने अंतिम फेरी हुकल्याने त्याची भूक आणखी वाढली
असून, आगामी स्पर्धांमध्ये तो अधिक जोमाने
तयारी करून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments