केतकी थिटेला दुहेरी मुकूट!
मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी बॅडमिंटन
स्पर्धेत अव्वल मानांकित केतकीचे वर्चस्व
हेझल जोशीचीही विजेतेपदाची झेप
मुंबई : गोरेगावच्या कोर्टवर बॅडमिंटनचा थरार रंगला आणि
अव्वल मानांकित
केतकी थिटेने पुन्हा एकदा आपल्या खेळाची ताकद दाखवत
दुहेरी मुकूटावर
कब्जा केला! मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद आणि निवडचाचणी बॅडमिंटन
स्पर्धा २०२६ मध्ये केतकीने १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे
विजेतेपद पटकावत महिलांच्या एकेरीतील विजेतेपदानंतर सलग दुसरे सुवर्ण यश मिळवले.
मायरा ओकवर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व
१९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात
केतकी थिटेने
आपली आक्रमकता आणि
सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर मायरा ओकचा १५-१२, १५-१ असा धुव्वा उडवला.
विशेष म्हणजे,
याआधी रविवारी
झालेल्या महिलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यातही केतकीने
मायरा ओकवर मात
केली होती.
त्यामुळे एकाच प्रतिस्पर्ध्यावर सलग दोन अंतिम सामन्यांत विजय मिळवत केतकीने आपले
वर्चस्व अधोरेखित केले.
प्रविथ साहूचा १९ वर्षांखालील गटात जलवा
१९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात
प्रविथ साहूने
संयमी आणि प्रभावी
खेळ करत ऋषभ गजवानीचा १६-१४, १५-५ असा पराभव
केला. पहिल्या
गेममध्ये रंगलेली चुरस मोडून काढल्यानंतर प्रविथने दुसऱ्या गेममध्ये एकतर्फी
वर्चस्व गाजवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
हेझल जोशीची दमदार विजेतेपदाची झेप
अव्वल मानांकित हेझल जोशीने आपली शानदार विजयी घोडदौड कायम ठेवत १३ वर्षांखालील
मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात
हेझलने मायरा
गोराडियाचा १५-१०, १५-७ असा दणदणीत पराभव
करत आपले वर्चस्व
सिद्ध केले.
युवा शटलर्सनीही गाजवले मैदान
११ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात
लक्ष्य गौरने अधृत
सिंगवर १५-९, १५-९ अशी मात केली. ११ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत
काव्या सरवणकुमारने
काशी माहेश्वरीवर १२-१५, १५-१३, १५-१३ असा संघर्षपूर्ण विजय
मिळवला. १३
वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात अभिमन्यू शेटेने अजिंक्य देसाईचा १५-१०,
१५-१३ असा पराभव
केला.
१५ वर्षांखालील गटात प्रबीर चीमाची बाजी
१५ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात
प्रबीर चीमाने
सुरुवातीचा गेम
गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत अजिंक्य देसाईवर ११-१५,
१५-७,
१५-११ असा विजय
मिळवला आणि
विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेतील अंतिम निकाल
१९ वर्षांखालील मुले:
श्रीहान दुबे
विजयी वि.
आरव चितलांगिया
१५-७,
१५-६.
११ वर्षांखालील
मुले: लक्ष्य गौर विजयी वि. अधृत सिंग १५-९, १५-९. ११ वर्षांखालील मुली:
काव्या सरवणकुमार
विजयी वि.
काशी माहेश्वरी
१२-१५,
१५-१३,
१५-१३.
१३ वर्षांखालील
मुले: अभिमन्यू शेटे
विजयी वि.
अजिंक्य देसाई
१५-१०,
१५-१३.
१३ वर्षांखालील
मुली: हेझल जोशी विजयी वि. मायरा गोराडिया
१५-१०,
१५-७.
१५ वर्षांखालील
मुले: प्रबीर चीमा विजयी वि. अजिंक्य देसाई
११-१५,
१५-७,
१५-११.

Post a Comment
0 Comments