Type Here to Get Search Results !

खेलो तायक्वाँडो अकादमीचा ‘पदकांचा पंच’ ३५ पदकांची घसघशीत कमाई! १४ सुवर्ण, ९ रौप्य, १२ कांस्य; १४ व १७ वर्षांखालील गटात खेळाडूंचा दमदार ठसा

 


खेलो तायक्वाँडो अकादमीचा ‘पदकांचा पंच’

३५ पदकांची घसघशीत कमाई!

१४ सुवर्ण, ९ रौप्य, १२ कांस्य; १४ व १७ वर्षांखालील गटात खेळाडूंचा दमदार ठसा

मुंबई : आंतरशालेय तायक्वाँडोच्या रिंगमध्ये खेलो तायक्वाँडो अकादमीच्या खेळाडूंनी अक्षरशः पदकांचा धडाका उडवला! विविध वजनी गटांत आक्रमक खेळ, अचूक तंत्र आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अकादमीच्या खेळाडूंनी १४ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य अशी तब्बल ३५ पदके आपल्या नावावर केली. १४ आणि १७ वर्षांखालील या दोन्ही वयोगटांत अकादमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच आव्हान दिले.

 

१४ वर्षांखालील मुलींचा सुवर्ण ठसा

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या पवार, मृणाली राऊत आणि अवनी सुगंधी यांनी सुवर्णपदके पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. राशी विश्वकर्मा हिने रौप्यपदक मिळवले, तर चैताली राठोड, दुर्वा शिंदे, स्वामिनी सालगावकर आणि आराध्या मंडल यांनी कांस्यपदके जिंकत अकादमीच्या पदकसंख्येत भर घातली.

 

१४ वर्षांखालील मुलांनीही मारली बाजी

मुलांच्या १४ वर्षांखालील गटात हर्ष दळवी, ओमिश आचरेकर, अर्णव आहेर आणि दक्ष शेजवळ यांनी सुवर्णपदकांवर नाव कोरले. शौर्य त्यागी आणि आराध्य मोरे यांनी रौप्यपदकाची कमाई करत आपला दम दाखवला.

 

१७ वर्षांखालील मुलांचा सुवर्णधडाका

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अकादमीच्या खेळाडूंनी अक्षरशः वर्चस्व गाजवले. वरद साने, वेद राऊत, जय गोस्वामी, अनुज सावंत, सार्थक चव्हाण आणि पार्थ मोरे यांनी सुवर्णपदके जिंकत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. विघ्नेश महाजन, यशपाल चौधरी, विवांश घोष आणि स्वराज सकपाळ यांनी रौप्यपदके पटकावली. तर आरुष जाधव, अर्णव शर्मा, शुभम दुधे, कार्तिक कदम, वंश सुतार आणि यश सिसोदिया यांनी कांस्यपदके मिळवली.

 

१७ वर्षांखालील मुलींचीही चमकदार कामगिरी

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या कांबळे हिने सुवर्णपदक पटकावत अकादमीचा झेंडा उंचावला. अस्मिता गुप्ता आणि आयुषी वाईगणकर यांनी रौप्यपदके जिंकली, तर काव्या म्हात्रे आणि शगुन सिंग यांनी कांस्यपदकांची कमाई केली.

 

प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला यशाची जोड

या घवघवीत यशामागे खेळाडूंच्या सातत्यपूर्ण सरावासोबत प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले. राजेश मुराव, कार्तिक नायडू, तुषार पाटील, स्वप्नील साळुंके, शिवानी खोले आणि प्रियंका परब यांच्या मार्गदर्शनाखाली अकादमीचे खेळाडू नियमित सराव करत आहेत. त्यांच्या मेहनतीला आंतरशालेय स्पर्धेतील ३५ पदकांच्या घसघशीत यशाची पावती मिळाली.

 

पदकांपलीकडे मोठ्या यशाची चाहूल

आंतरशालेय स्तरावर एवढ्या मोठ्या संख्येने पदके मिळवणे हे केवळ आकडेवारीचे यश नाही; तर खेलो तायक्वाँडो अकादमीमध्ये तयार होत असलेल्या नव्या तायक्वाँडो पिढीची ताकद त्यातून स्पष्ट होते. सुवर्णपदक विजेत्यांपासून कांस्यपदक विजेत्यांपर्यंत प्रत्येक खेळाडूने रिंगमध्ये दाखवलेली जिद्द आणि मेहनत भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी आश्वासक चित्र निर्माण करणारी आहे.


Post a Comment

0 Comments