एलआयसी-महापौर
शालेय बुद्धिबळात रिहान कुळकर्णी, अर्हा
वाघमारे गटविजेते!
रिहानची
२५व्या चालीला निर्णायक मात
अर्हाची
५ पैकी ५ विजयांसह निर्विवाद विजयी घोडदौड
मुंबई
: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आनंदराव अडसूळ
चॅरिटेबल ट्रस्टतर्फे, लाइफ इन्शुरन्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) सहपुरस्कृत एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ
स्पर्धेच्या ९ वर्षांखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित रिहान कुळकर्णीने,
तर १३ वर्षांखालील गटात अर्हा वाघमारेने गटविजेतेपद
पटकाविले. निर्णायक फेरीतील चुरशीच्या लढती आणि अचूक चालींनी स्पर्धेत रंगत
निर्माण केली.
रिहानची
२५व्या चालीला निर्णायक मात!
९
वर्षांखालील गटातील निर्णायक पाचव्या फेरीत पहिल्या पटावर अपराजित सोहिला कौर
आणि रिहान कुळकर्णी यांच्यात विजेतेपदासाठी घनघोर लढत रंगली. दोन्ही खेळाडूंनी
आक्रमक चाली रचत एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केला. अखेर रिहानने २५व्या चालीला
सोहिला कौरच्या राजाला नमवून महत्त्वपूर्ण विजय मिळविला आणि गटविजेतेपदावर नाव
कोरले. विजेत्या रिहानला आकर्षक चषक व भेटवस्तू देऊन नगरसेवक रोहिदास लोखंडे
यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अर्हा
वाघमारेची ५ पैकी ५ विजयांसह बाजी!
परेल
येथील आरएमएमएसच्या वातानुकूलित सभागृहात झालेल्या १३ वर्षांखालील गटात अर्हा
वाघमारेने स्विस साखळीतील सर्व ५ सामने जिंकत ५ गुणांसह निर्विवाद विजेतेपद पटकाविले.
सातत्यपूर्ण कामगिरी आणि प्रभावी खेळाच्या जोरावर अर्हाने प्रतिस्पर्ध्यांना संधी
न देता गटावर वर्चस्व गाजवले. या गटात फिडे गुणांकित मयुरेश पाटीलने ३.५
गुणांसह द्वितीय, अर्णव जगतापने ३.५
गुणांसह तृतीय, प्रणव जैनने ३ गुणांसह चतुर्थ,
तर दीप फुणगेने ३ गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.
९
वर्षांखालील गटात रिहान अव्वल
९
वर्षांखालील गटात रिहान कुळकर्णीने ५ गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. अंश
शर्माने ४ गुणांसह द्वितीय, निर्णायक
फेरीत रिहानकडून पराभूत झालेल्या सोहिला कौरने ४ गुणांसह तृतीय, रिहान दुबेने ४ गुणांसह चतुर्थ, तर ओनीर
वर्तकने ३.५ गुणांसह पाचवा क्रमांक पटकाविला.
मान्यवरांच्या
उपस्थितीत पारितोषिक वितरण
पारितोषिक
वितरण समारंभाला क्रीडाप्रेमी विष्णू तांडेल,
जनार्दन मोरे, अशोक नवले,
बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजाबाबू गजेंगी आणि शिवछत्रपती
पुरस्कारविजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. शालेय
बुद्धिबळपटूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंनी
उत्साहाने सहभाग घेत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

Post a Comment
0 Comments