Type Here to Get Search Results !

यंग भारत सेवा मंडळाची ‘हिरक महोत्सवी’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २३ नोव्हेंबरपासून! प्रभादेवीत पाच दिवस रंगणार कुमार गटाचा थरार महाराष्ट्रातील १२ निमंत्रित संघांचा सहभाग

 


यंग भारत सेवा मंडळाची ‘हिरक महोत्सवी’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २३ नोव्हेंबरपासून!

प्रभादेवीत पाच दिवस रंगणार कुमार गटाचा थरार

महाराष्ट्रातील १२ निमंत्रित संघांचा सहभाग

 

मुंबई : यंग भारत सेवा मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त प्रभादेवीत कबड्डीचा धुरळा उडणार आहे! मंडळाच्या वतीने २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कुमार गटाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील चालू हंगामातील ही पहिली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठरणार असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १२ निमंत्रित संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

 

स्व. राजाभाऊ साळवी क्रीडानगरीत रंगणार सामने

प्रभादेवी येथील स्व. राजाभाऊ साळवी क्रीडानगरीतील स्व. भिकाजी गुणाजी भारती मातीच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील युवा कबड्डीपटूंना आपले कौशल्य, चपळाई आणि सांघिक ताकद दाखविण्याची संधी मिळणार आहे.

 

उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ

कुमार गटातील खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव देणे आणि त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेचा अनुभव मिळवून देणे, हा या आयोजनामागील महत्त्वाचा उद्देश आहे. विविध जिल्ह्यांतील संघ आमनेसामने येणार असल्याने प्रेक्षकांना चुरशीचे सामने पाहायला मिळतील. प्रभादेवी परिसरातील कबड्डीप्रेमींनाही युवा खेळाडूंच्या दमदार खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. यंग भारत सेवा मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेबाबत मंडळाचे सचिव शंकर पाटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.

 

अधिक माहितीसाठी संपर्क :

  • शंकर पाटकर: ९७०२५९२६८३
  • सुधीर खानोलकर: ९३२३२१४४८८

Post a Comment

0 Comments