संघर्ष मंडळाची विजयी घोडदौड! सलग दोन विजयांसह बाद
फेरीत धडक
ठाणे जिल्हा किशोरी गट कबड्डी निवड चाचणीत कोनगावच्या
संघर्षची दमदार कामगिरी
पिछाडीवरून ओम् रुद्रवर मात,
जयभारत स्पोर्ट्सची
एका गुणाने बाजी
ठाणे : पिछाडीवर असतानाही हार न मानता सामन्याचे पारडे
फिरवण्याची जिद्द आणि प्रत्येक गुणासाठी शेवटपर्यंत झुंज देण्याची तयारी... याच
जोरावर कोनगावच्या संघर्ष मंडळाने सलग दोन विजयांची नोंद करीत बाद फेरीत
दिमाखात प्रवेश केला. ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या किशोरी गट निवड चाचणी
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संघर्षच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. रा. फ.
नाईक स्पोर्ट्स आणि ग्रीफिन्स जिमखाना यांच्या संयुक्त सहकार्याने कोपरखैरणे येथील
रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
संघर्षची दुहेरी बाजी;
आदिती,
न्यासी,
निधी,
हेमल चमकल्या
ह गटात कोनगावच्या
संघर्ष संघाने
पहिल्या सामन्यात
ओम् साई मंडळाचा १९-१७ असा दोन गुणांनी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात
पहिल्या डावात १६-१७ अशा एका गुणाने पिछाडीवर
असतानाही संघर्षने
जोरदार पुनरागमन केले. उत्तरार्धात खेळ उंचावत
ओम् रुद्र संघावर
३१-२७ अशी मात केली. या दोन्ही विजयांत
आदिती माळी,
न्यासी तिवारी,
निधी केणी आणि हेमल
महाले यांनी उत्कृष्ट खेळ केला. ओम् साईकडून
रिद्धी चव्हाण,
तर ओम् रुद्रकडून
आर्या बोरसे
यांनी चमकदार
कामगिरी केली.
ज्ञानविकासचा पहिला विजय;
वैभवी सिंगची छाप
ब गटात ज्ञानविकासने राम तनु संघाला ३३-२१
असे नमवून साखळीतील
पहिला विजय नोंदवला. मध्यंतराला ज्ञानविकासकडे
१३-८ अशी पाच
गुणांची आघाडी होती. ही आघाडी कायम राखत ज्ञानविकासने सामना आपल्या
बाजूने झुकवला. विजयी संघाकडून वैभवी सिंग, तर राम तनुकडून स्फूर्ती प्रजापती
हिने शानदार खेळ
केला.
जयभारतची एका गुणाने थरारक सरशी
क गटातील लढतीत जयभारत स्पोर्ट्सने शिवसाई मंडळाला ४३-४२
असे एका गुणाने
पराभूत करीत बाद फेरीच्या आशा कायम ठेवल्या. मध्यंतराला जयभारत
१७-१९ अशा दोन
गुणांनी पिछाडीवर होता. मात्र उत्तरार्धात
राजनंदिनी राठोड
आणि संस्कृती चव्हाण यांनी खेळाची लय बदलत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.
शिवसाईकडून कशिश आणि खुशी गुप्ता
यांचा
उत्तरार्धातील खेळ अपेक्षेप्रमाणे झाला नाही.
हिरकणीचा पिछाडीवरून दणदणीत विजय
ड गटात हिरकणी मंडळाने
पूर्वार्धातील
९-१७ अशा आठ
गुणांच्या पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करीत स्व. राकेशदादा संघाचा
३१-२१
असा पराभव केला.
पूर्वार्धात आकांक्षा चौगुले आणि चैताली शिंदे
यांनी स्व.
राकेशदादाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र उत्तरार्धात त्यांचा प्रभाव कमी झाला.
याचा फायदा घेत आर्या गुरव आणि दीपाली
यांनी चढाई-पकडीचा
धडाकेबाज खेळ करीत हिरकणीला दहा गुणांनी विजय मिळवून दिला.
काल्हेर महिला संघाची विजयी आगेकूच
ग गटात काल्हेर महिला संघाने माऊली स्पोर्ट्सला २८-१७
असे पराभूत केले.
किंजल जोशी आणि
गुडिया सरोज यांच्या अष्टपैलू खेळामुळे काल्हेरने विजयाची नोंद केली.
माऊलीकडून टी. परब आणि सायली जाधव
यांनी चांगली झुंज
दिली.
नऊ गटांतील बाद फेरीचे संघ निश्चित
रात्री उशिरापर्यंत सामने सुरू होते. त्यावेळी अ गटातून
छत्रपती शाहू
महाराज आणि जय अंबे मंडळ, ब गटातून ज्ञानविकास आणि रा. फ. नाईक,
क गटातून
शिवकन्या कबड्डी
संघ आणि जयभारत स्पोर्ट्स, ड गटातून हिरकणी मंडळ आणि स्व. राकेशदादा,
इ गटातून
ज्ञानशक्ती युवा
आणि किल्ले माऊली, फ गटातून कालिमाता आणि जिजाऊ प्रतिष्ठान,
ग गटातून
काल्हेर महिला संघ
आणि एकलव्य क्रीडा, ह गटातून संघर्ष मंडळ आणि ओम् रुद्र,
तर आय गटातून
विरांगणा मंडळ आणि
ओम् साई यांनी बाद फेरी गाठली होती. किशोरी गटातील पुढील फेरीत
कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

Post a Comment
0 Comments