भुल्लर-कोचर यांच्यात पुन्हा रंगणार टक्कर
प्रणवी
उर्सची विजेतेपद राखण्याची मोहीम!
एट्री
इन्व्हिटेशनल मुंबई गोल्फ स्पर्धेत २ कोटींचे पारितोषिक
भारतीय
पुरुष-महिला गोल्फपटूंसह युवा आणि हौशी खेळाडूंनाही संधी
मुंबई
: अनुभवाचा कस, नव्या
दमाच्या खेळाडूंची झुंज आणि विजेतेपदासाठीची प्रतिष्ठेची लढाई... अशा रंगतदार
समीकरणांमुळे एएम ग्रीन इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या (आयजीपीएल) एट्री
इन्व्हिटेशनल मुंबई २०२६ स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गगनजीत
भुल्लर आणि करंदीप कोचर यांच्यातील प्रतिस्पर्धी रंगत पुन्हा पाहायला मिळणार
असून, गतविजेती प्रणवी उर्स पुरुष खेळाडूंना मागे
टाकत मिळवलेले ऐतिहासिक विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. बॉम्बे
प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबच्या हिरवळीवर ५४ होलची ही स्पर्धा रंगणार असून विजेत्याला
३० लाख रुपये मिळणार आहेत.
भुल्लर-कोचर
आमनेसामने; विजेतेपदासाठी प्रतिष्ठेची
लढाई
गेल्या
आठवड्यात पुण्यात विजेतेपद पटकावणारा करंदीप कोचर आत्मविश्वासाने मुंबईत
दाखल झाला आहे. पुण्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या गगनजीत भुल्लरला
यावेळी बाजी उलटवण्याची संधी आहे. भुल्लरचा अनुभव आणि विजेतेपदांचा इतिहास,
तर कोचरची सातत्यपूर्ण कामगिरी आणि वाढता आत्मविश्वास यांच्यातील
संघर्ष स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भुल्लर सकाळी ९ वाजता एसएसपी
चौरसिया आणि सय्यद साकिब अहमद यांच्यासोबत, तर कोचर
सकाळी ९.५० वाजता अमन राज आणि चिराग कुमार यांच्यासोबत पहिल्या फेरीला
सुरुवात करणार आहेत.
प्रणवी
उर्सची ऐतिहासिक कामगिरी; विजेतेपद
राखण्याचे आव्हान
गतवर्षी
याच मैदानावर पुरुष-महिला मिश्र स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय महिला
व्यावसायिक गोल्फपटू ठरलेली प्रणवी उर्स पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी
आहे. तिने अंतिम लढतीत करंदीप कोचरला पराभूत केले होते. जपानमधील आशियाई क्रीडा
स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून परतलेली प्रणवी यंदा विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे.
महिला गटात भारतीय गोल्फ संघटनेच्या गुणवत्ता क्रमवारीतील विजेती रिधिमा
दिलावरी हिचेही आव्हान महत्त्वाचे ठरणार आहे.
महिला
गोल्फपटूंची दमदार उपस्थिती
महिला
गटात प्रणवी आणि रिधिमासह स्नेहा सिंह, विदात्री
उर्स, श्रेष्ठा शुक्ला, जान्हवी
प्रख्या, अमनदीप द्राल, अन्वी दहिया,
सेहर अटवाल, नेहा त्रिपाठी, मनत ब्रार आणि जस्मिन शेखर
अशा १२ व्यावसायिक खेळाडूंचा सहभाग आहे. समान पारितोषिक रक्कम आणि पुरुषांसोबत
स्पर्धा करण्याची संधी ही महिला गोल्फसाठी महत्त्वाची बाब ठरत आहे.
युवा
खेळाडूंची ताकद; अनुभवींचाही कस
युवा
गटात राघव चुग, हैदराबाद येथे
भुल्लरचा उपविजेता, वीर गणपती, दानिश
वर्मन, चैतन्य पांडे आणि कनव चौहान
यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. अनुभवी शिव कपूर, उदयन माने, पुखराज सिंग गिल, सचिन
बैसोया आणि सी. मुनियप्पा यांच्या उपस्थितीमुळे
स्पर्धेतील आव्हान अधिक कठीण होणार आहे. आर्यन रूपा आनंद, आदिल बेदी, सुखमन सिंह, अर्जुन
प्रसाद आणि सुनहित बिश्नोई यांचाही सहभाग स्पर्धेला रंगत
आणणार आहे.
मुंबई
गरुडांचा घरच्या मैदानावर आत्मविश्वास
मुंबई
गरुड संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव दातार यांनी संघाच्या
कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. उदयन माने,
आदिल बेदी, अमन राज आणि तुषार पन्नू
यांच्या योगदानामुळे संघाची ताकद वाढली आहे. ऑलिम्पियन उदयन माने यांनी
युवा खेळाडूंसोबत अनुभवाची देवाणघेवाण हा संघाचा सकारात्मक पैलू असल्याचे सांगितले,
तर अमन राज यांनी खेळाडूंमधील मैत्री आणि परस्पर
सहकार्यामुळे संघभावना अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट केले.
गोल्फला
नवी दिशा देणारी स्पर्धा
आयजीपीएलचे
मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम सिंह मुंडी यांच्या मते,
ही स्पर्धा केवळ गोल्फ लीग नसून महिला, पुरुष,
युवा आणि हौशी खेळाडूंना समान व्यासपीठ देणारा अभिनव उपक्रम आहे. एक्स-गोल्फ
स्वरूप, शालेय स्तरावरील उपक्रम आणि नव्या प्रेक्षकांना
जोडण्याच्या प्रयत्नांमुळे भारतीय गोल्फला नवी दिशा मिळत आहे. भुल्लर-कोचर यांची
टक्कर, प्रणवीची विजेतेपद मोहीम आणि युवा खेळाडूंचा उत्साह
यामुळे मुंबईतील गोल्फचा हा आठवडा निश्चितच संस्मरणीय ठरणार आहे.



Post a Comment
0 Comments